समुद्रपुरात कोरोनाची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:22+5:30

सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण वाढलेले होते. भरती केल्यानंतर दोन तासानंतर तिला ताप आला.

Corona's 'entry' into the Samudrapur | समुद्रपुरात कोरोनाची ‘एन्ट्री’

समुद्रपुरात कोरोनाची ‘एन्ट्री’

Next
ठळक मुद्देमहिला बाधित : कानकाटीत सहा कुटुंबांतील ३९ सदस्य ‘हायरिस्क’मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जिल्ह्यात एकमेव समुद्र्रपूर तालुका कोरोनामुक्त असतांनाच गुरुवारी संध्याकाळी नऊ वाजता कानकाटी येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला. कानकाटी गावाच्या बाहेरील परिसरात महिलेचे वास्तव्य असल्याने घराचा परिसर प्रशासनाने कन्टटमेंट झोन म्हणून घोषित केला तर खबरदारीचा उपाय म्हणून कानकाटी गावातही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण वाढलेले होते. भरती केल्यानंतर दोन तासानंतर तिला ताप आला. डॉक्टरांना शंका आल्यानंतर कोरोना चाचणी करण्याकरिता गुरुवारी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांना कळविले. रुग्णाला ह्रदयविकाराचे लक्षण दिसल्याने पुढील उपचार करण्याकरिता डिस्चार्ज देण्यात आला. ह्रदयविकार निदानासाठी नागपूर येथे उपचाराकरिता आणले असता कोरोना चाचणीचा अहवाल न आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी तिला भरती करण्यास नकार दिला. त्यामुळे महिला व तिचा नातेवाईक घरी परतले. गुरुवारी रात्री नऊ वाजता तिचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे कळले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत तिला सेवाग्रामला भरती केले. शुक्रवारी समुद्र्रपूरचे नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील भगत हे संपूर्ण चमू सह तिथे पोहोचले व नातलगांकडून रुग्णाचा इतिहास जाणून घेतला. एकूण सहा कुटुंबातील ३९ व्यक्ती हायरिस्कमध्ये असून घराचा परिसर कन्टेटमेंट झोन घोषित केला. घरातील इतर व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त न झाल्यामुळे कानकाटी गावात सुद्धा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ग्रामिण रुग्णालयाचे डॉक्टरांनी हाय रिस्क मधील ३९ संशयितांचे स्वॅब घेतले असून त्याचा अहवाल काय येतो? यांकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
या वेळी प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसिलदार हेमंत तायडे, ठाणेदार हेमंत चांदेवार , सरपंच बलराम राऊत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल भगत, मांडगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शोभा लांजेवार, आरोग्य विस्तार अधिकारी एस एम वानखेडे,मंडळ अधिकारी धर्मेंद्र गायकवाड,तलाठी सुनील जाधव उपस्थित होते. कानकाटीत रूग्ण आढळताच समुद्रपूर तालुक्यात कोरोनाचा प्रवेश झाला.
 

Web Title: Corona's 'entry' into the Samudrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.