घोराडात आढळला कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:16+5:30

सावंगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आलेला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तशी सूचना शासकीय यंत्रणेला मिळताच शनिवारी रात्री ११ वाजता ठाणेदार, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चमू गावात पोहोचली व पहाटेपर्यंत बाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील करण्यात आला. तर संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना तपासणीकरिता पाठविण्यात आले.

Coronadoid found in horses | घोराडात आढळला कोरोनाबाधित

घोराडात आढळला कोरोनाबाधित

ठळक मुद्देअनेकांना केले क्वारंटाईन : घरासभोवतालचा परिसर सील

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : येथील युवा शेतकरी कोरोनाबाधित असल्याची माहिती शनिवारी रात्री प्रशासनाला प्राप्त होताच सर्व यंत्रणा जागी झाली आणि हा परिसर सील करण्यात आला.
घोराड येथील व्यक्तीची प्रकृती काही दिवसांपासून बरी नसल्याने त्याने सेलू येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, छातीत वेदना होऊ लागल्याने २४ जुलैला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेत असताना नागपूर अथवा सावंगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
सावंगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आलेला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तशी सूचना शासकीय यंत्रणेला मिळताच शनिवारी रात्री ११ वाजता ठाणेदार, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चमू गावात पोहोचली व पहाटेपर्यंत बाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील करण्यात आला. तर संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना तपासणीकरिता पाठविण्यात आले. रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर रविवारी सकाळपासूनच आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधही या सर्वेक्षणातून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद
गावातील बाजारपेठ बंद ठेवण्याबाबतची कोणतीही सूचना स्थानिक प्रशासनाने दिली नाही. मात्र, किराणा, कापड व स्टेशनरी दुकानदारांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली.

तलाठी कार्यालय बंद राहणार
घोराड येथील तलाठी कार्यालय सील केलेल्या भागात येत असल्याने १४ दिवस बंद राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होऊ नये म्हणून येथील तलाठी तहसील कार्यालयातून शेतकरी व नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्र देतील.

अधिकारी दिवसभर गावात
तहसीलदार सोनोने, ठाणेदार सुनील गाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी बेले, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, तलाठी सुनिल ठाकरे, पोलीस पाटील व ग्रामपंचायतचे पदाधिकारी दिवसभर गावात होते. येथील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी मोनाली पिसे, आरोग्यसेवक, सेविका व आशा स्वयंसेविका यांनीही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या घरी भेटी दिल्या.

Web Title: Coronadoid found in horses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.