शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

आर्वी तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:00 AM

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे त्यामुळे प्रशासन खडबळू जागे झाले आहे.

ठळक मुद्देचौघांचा मृत्यू : ५७ रुग्ण झाले कोरोनामुक्त, ११२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शासकीय आकडेवारीनुसार ११२ झाली असून त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता आर्वी तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालल्याचे चित्र आहे.कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे त्यामुळे प्रशासन खडबळू जागे झाले आहे. ट्रेस, टेस्ट आणि स्ट्रीट या त्रिसूत्री संकल्पनेवर भर देऊन तालुक्यात कोरोना विषाणू प्रसारला अटकाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.उपजिल्हा रुग्णालयात अ‍ॅन्टीजेन कीटद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित रुग्ण लवकरात लवकर ट्रेस व्हावा, या उद्देशाने रॅपीड अ‍ॅन्टीजेन कीटद्वारे २७ जुलै रोजीपासून कोविड चाचणी सुरु करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अवघ्या ४५ मिनिटात मिळत असल्याने बाधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ही कीट उपयुक्त ठरत असून आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्याला गती आली आहे.स्वत:ची काळजी स्वत: घ्याआर्वी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतीवर असून आर्वी तालुका हॉटस्पॉटकडे वळत आहे. वाढता प्रभाव बघता नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपणच आपली काळजी घेऊन कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या