आर्वी तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:37+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे त्यामुळे प्रशासन खडबळू जागे झाले आहे.

Corona gorge in Arvi taluka | आर्वी तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट

आर्वी तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट

googlenewsNext
ठळक मुद्देचौघांचा मृत्यू : ५७ रुग्ण झाले कोरोनामुक्त, ११२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शासकीय आकडेवारीनुसार ११२ झाली असून त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता आर्वी तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालल्याचे चित्र आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे त्यामुळे प्रशासन खडबळू जागे झाले आहे. ट्रेस, टेस्ट आणि स्ट्रीट या त्रिसूत्री संकल्पनेवर भर देऊन तालुक्यात कोरोना विषाणू प्रसारला अटकाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात अ‍ॅन्टीजेन कीटद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित रुग्ण लवकरात लवकर ट्रेस व्हावा, या उद्देशाने रॅपीड अ‍ॅन्टीजेन कीटद्वारे २७ जुलै रोजीपासून कोविड चाचणी सुरु करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अवघ्या ४५ मिनिटात मिळत असल्याने बाधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ही कीट उपयुक्त ठरत असून आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्याला गती आली आहे.

स्वत:ची काळजी स्वत: घ्या
आर्वी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतीवर असून आर्वी तालुका हॉटस्पॉटकडे वळत आहे. वाढता प्रभाव बघता नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपणच आपली काळजी घेऊन कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Corona gorge in Arvi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.