कोरोनाची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:33+5:30

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसेवा बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोरील शिवाजी प्राथमिक शाळेत तपासणी रुग्ण उघडण्यात आला आहे.

Corona enters Arvi sub-district hospital | कोरोनाची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात ‘एन्ट्री’

कोरोनाची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात ‘एन्ट्री’

ठळक मुद्देकक्षसेवकासह परिचारिका पॉझिटिव्ह : आर्वी तालुक्यातील बाधितांची संख्या पोहोचली २४ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : शहरास ग्रामीण भागात शिरकाव करणाऱ्या कोरोना विषाणूने आता येथील उपजिल्हा रुग्णालयांत ‘एन्ट्री’ केली असून एका ५५ वर्षीय कक्षसेवकासह ३५ वर्षीय परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता आर्वीत एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २४ वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थेट रुग्णालयात शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविणे सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयात टेस्टिंग सुरू झाल्या आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक राहत असलेली वसाहत सील करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागातील एक कर्मचारी अमरावती येथून १५ रोजी श्रीहरी कॉलनी येथे परतला. याबाबत नागरिकांनी सतर्कता म्हणून नोडल अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याची दखल घेत सर्व आरोग्य कर्मचाºयांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अधीक्षक धरमठोक यांनी दिली. वाढती रुग्णसंख्या बघता आर्वी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनतो की काय, अशी भीती नागरिकांमध्ये आहे.

एसडीपीओ क्वारंटाईन
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे हे कोरोना काळात नाशिक येथे कर्तव्य बजाविण्यासाठी गेले होते. ते गावात परतताच त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य विभागातील एका कर्मचाºयालाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

उपजिल्हा रुग्णालय दोन दिवस बंद
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसेवा बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोरील शिवाजी प्राथमिक शाळेत तपासणी रुग्ण उघडण्यात आला आहे.

Web Title: Corona enters Arvi sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.