नगरपालिकेच्या तिजोरीवरही ‘कोरोना इफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:19+5:30

न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चपर्यंत कर वसुलीची नगरपालिकेला संधी होती. शेवटच्या काही दिवसांत मोठ्याप्रमाणात मालमत्ताकर वसुली होत असते.

'Corona effect' on municipal coffers too | नगरपालिकेच्या तिजोरीवरही ‘कोरोना इफेक्ट’

नगरपालिकेच्या तिजोरीवरही ‘कोरोना इफेक्ट’

ठळक मुद्देकरवसुलीला फटका । मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट केवळ ५८ टक्केच पूर्ण

चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र आर्थिक मंदी आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच आर्थिक व्यवहार थांबल्याने ‘मार्च एंन्डिग’चे आर्थिक वर्षाअखेरचे गणितही विस्कटले आहे. त्यात वर्धा नगर पालिकेचा मालमत्ताकर वसुलीला मोठा फटका बसला असून २०१९-२० या वर्षाच्या १२ कोटी ६२ लाखांच्या मागणीपैकी सुमारे ७ कोटी ४३ लाख ४५ हजारांची इतकी ५८ टक्केच वसुली झाली आहे.
न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चपर्यंत कर वसुलीची नगरपालिकेला संधी होती. शेवटच्या काही दिवसांत मोठ्याप्रमाणात मालमत्ताकर वसुली होत असते. परंतु, यंदा मार्च महिना संपण्याच्या अगोदरच ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्याने नगरपालिकेची मालमत्ताकर वसुलीचा अर्थिक स्त्रोत देखील ‘लॉकडाऊन’ झाला आहे.

शहरात सुमारे २६ हजारांच्या जवळपास मालमत्ताधारक असून त्यांच्याकडून २०१९-२० या वर्षाची चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख रुपयांचा कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यात मार्च महिन्याच्या शेवटी ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने मालमत्ताकर वसुलीचे सर्व नियोजन कोलमडल्याने नगरपालिकेची मालमत्ता करातून येणारी रक्कम ‘लॉकडाऊन’ होऊन गेली.
२०१९- २० या वर्षाची मालमत्ताधारकांकडून ५ कोटी ५२ लाख रूपयांच्या पाणीपट्टीकर वसुलीचे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा नगरपालिकेला उद्दिष्ट होते. पण, ‘लॉकडाऊन’मुळे मार्च अखेरपर्यंत १ कोटी ६७ लाख ६१ हजार रूपये म्हणजेच केवळ ३० टक्के पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला आहे.

Web Title: 'Corona effect' on municipal coffers too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर