घर बांधकामाच्या स्वप्नाला कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:34+5:30

तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच्चा विटा विरघळल्याने वीट निर्मितीस वेळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षी घर निर्माण होईल की, नाही अशी शंका घर बांधकाम करणाºयांना भेडसावत आहे.

Corona eclipses the dream of home construction | घर बांधकामाच्या स्वप्नाला कोरोनाचे ग्रहण

घर बांधकामाच्या स्वप्नाला कोरोनाचे ग्रहण

Next
ठळक मुद्देकुटुंबियांमध्ये चिंता। शेड उभारुन उदरनिर्वाह सुरू मजूर कामावर येण्यास तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहणा : परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांनी जुने जीर्ण झालेले घर पाडून नवीन बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. त्यापूर्वी निवास व्यवस्था म्हणून अनेकांनी तात्पुरते शेड उभारले. पण, आठ दिवसांपासून वादळी पावसाने कहर केल्याने टिनाचे छप्पर उडत असून अनेकांचे घराची पडझड झाली आहे. तसेच संचारबंदी लागल्याने घर बांधकामाकरीताच्या साहित्याची आयात बंद झाल्याने घराचे स्वप्न पूर्ण कधी होणार, याच चिंतेत नागरिक आहे. शेड उभारून धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या वीटा, वाळू आदी साहित्याची आयात बंद आहे. मजुरवर्ग कामावर येत नसल्याने घर बांधकाम करणाऱ्यांसमोर घराचे काम पूर्ण करणे हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच्चा विटा विरघळल्याने वीट निर्मितीस वेळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षी घर निर्माण होईल की, नाही अशी शंका घर बांधकाम करणाऱ्यांना भेडसावत आहे.
तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडमध्ये संपूर्ण कूटूंब आपल्या निवाऱ्याची सोय करून लवकरात लवकर घर उभे होईल व त्यात प्रवेश करू अशी आशा अनेकांच्या मनात होती. पण, पावसाळाच्या दिवसात या अपुऱ्या व धोकादायक शेडमधेच जीवन जगावे लागणार असल्याने त्यांच्यासमोर मोठ प्रश्न उभा ठाकला आहे.

विट निर्मितीवर ही परिणाम बांधकामे थांबली'
मार्च, एप्रिल महिन्यात बांधकामे केली जातात. यंदा नागरिकांनी ग्रामीण भागात घर, शेतातील गोठे यांचे बांधकाम सुरू केले होते. पंरतु मार्च महिन्यात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली यांचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. विटा, रेती, सिंमेट, लोखंड हे साहित्य मिळणे बंद झाल्याने बांधकामे ठप्प पडली आहे. या कामांसाठी मजूरही मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

Web Title: Corona eclipses the dream of home construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.