पुलगाव-आर्वी नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करा

By Admin | Updated: August 10, 2016 00:34 IST2016-08-10T00:34:56+5:302016-08-10T00:34:56+5:30

संपूर्ण भारतात नॅरोगेज लाईन समाप्त करून ब्रॉडगेज लाईन तयार करण्यासंदर्भात रेल्वे विभागाकडून योजना तयार करण्यात आलेली आहे;

Convert the Pulgaon-Arvi Narogej line to a broad gauge | पुलगाव-आर्वी नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करा

पुलगाव-आर्वी नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करा

रामदास तडस यांनी वेधले लोकसभेचे लक्ष
वर्धा : संपूर्ण भारतात नॅरोगेज लाईन समाप्त करून ब्रॉडगेज लाईन तयार करण्यासंदर्भात रेल्वे विभागाकडून योजना तयार करण्यात आलेली आहे; परंतु पुलगाव-आर्वी-मूर्तिजापूर-यवतमाळ व मूर्तिजापूर-अचलपूर या नॅरोगेज रेल्वे लाईनचे अजूनपर्यंत ब्रॉडगेज लाईन बदल करण्यासंदर्भात प्रगती झालेली नाही. विदर्भातील महत्त्वूपर्ण असलेला प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासंदर्भात शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.
२००१ पुलगाव-आर्वी नॅरोगेजला ब्रॉडगेज मध्ये बदलण्यासंदर्भात निर्णय झालेला होता. त्यानुसार महामहिम राष्ट्रपतींच्या आदेशानुसार निविदा सूचना काढण्यात आली. या सूचनेनुसार उपमुख्य अभियंता मध्य रेल्वे, अजनी, नागपूर द्वारा पुलगाव-आर्वी नॅरोगेज लाईनला ब्रॉडगेजमध्ये बदलण्याकरिता १८ जानेवारी २००१ रोजी निविदा आमंत्रित करण्यात आलेली होती. त्यानुसार रेल्वे लाईनवरील छोट्या मोठ्या पुलांचे बांधकाम सुद्धा करण्यात आलेले आहे; परंतु त्यानंतर रेल्वे लाईनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे पुलगाव-आर्वी-मूर्तिजापूर-यवतमाळ व मूर्तिजापूर-अचलपूर लाईनचे नॅरोगेज रेल्वेलाईनचे ब्रॉडगेज रेल्वेलाईनमध्ये बदल करण्यासंदर्भात तसेच पुलगाव आर्वी रेल्वे लाईन आमला पर्यंत वाढविण्यासंदर्भात लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत खा. तडस यांनी प्रश्न उपस्थित केला.(प्रतिनिधी)

Web Title: Convert the Pulgaon-Arvi Narogej line to a broad gauge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.