‘पर्यावरण हक्क व शाश्वत विकास’वर अधिवेशन
By Admin | Updated: November 14, 2016 00:52 IST2016-11-14T00:52:06+5:302016-11-14T00:52:06+5:30
सेवाग्राम येथील यात्रीनिवास येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वुमेन चाईल्ड अॅन्ड युथ डेव्हलपमेंट’ नागपूर

‘पर्यावरण हक्क व शाश्वत विकास’वर अधिवेशन
देशातील १८ राज्यातून २०० युवक-युवतींचा सहभाग
वर्धा : सेवाग्राम येथील यात्रीनिवास येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वुमेन चाईल्ड अॅन्ड युथ डेव्हलपमेंट’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण हक्क व शास्वत विकास’ विषयावर तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. यात देशातील १८ राज्यातील विविध सामाजिक संस्थांमध्ये पर्यावरणावर कार्य करणारे २०० युवक-युवती सहभागी झाले. अधिवेशनाचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाले.
मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, न्यूसिडचे अध्यक्ष राजेश मालविय, इन्ग्रीड मेन्डोन्सा विभागीय समन्वयक टेरेडेस होम्स पुणे व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, जॉर्ज चिरा उपस्थित होते.
दीप्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नयना गुंडे यांनी, आज पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव व परिणाम प्रदूषणावर होत आहे. आज आनंददायी आणि कौतुकाची बाब म्हणजे युवक-युवतींनी पर्यावरणाचे महत्त्व जाणले आणि यासाठी ते काम करीत असल्याचे दिसून येत आहे; पण ही चळवळ मोठ्या संख्येने पुढे नेणे गरजेचे आहे. या कार्याची धुरा युवक-युवतींनी आपल्या खांद्यावर घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.
रॅली, पथनाट्य सादरीकरणाने अधिवेशनाचा समारोप
प्रत्येक राज्यातील युवा प्रतिनिधींनी पर्यावरण जागृतीसाठी विविध स्टॉल लावून प्रदर्शन केले. शनिवारी म. गांधी विद्यालय ते वर्धा शहरापर्यंत रॅली काढली. यात प्लास्टिक वापरावर बंदी, झाडे लावा झाडे वाचवा, पाण्याचा संतुलीत वापर आदींवर पथनाट्य सादर केले. रविवारी समुह चर्चा झाली व घोषणापत्र वाटले गेले. यानंतर अधिवेशनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. इनग्रीड मॅन्डोसा, आर.के. मालविया, न्यूसीड नागपूर यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.