शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार काम देण्यासाठी आला आणि मजुराच्या पत्नीसोबत दुचाकी घेऊन पळाला; कळंब येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:32 IST

Wardha : लातूरच्या कंत्राटदाराने शरद परिसरातील एका ऊसतोड मजुराच्या जबाबदारीवर २० जोडपे मजूर देण्याचा करार केला. कंत्राटदाराने यासाठी नऊ लाख रुपये मजुरांना इसार म्हणूनही दिले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : लातूर येथील एका ऊसतोड कंत्राटदाराने शरद व परिसरातील मजुरांसोबत ऊसतोडीचा करार केला. मजूर दुसरीकडे कामाला गेल्याच्या रागातून कंत्राटदाराने चक्क एका मजुराच्या पत्नीलाच रात्री दोन वाजता पळवून नेले. सोबतच त्याची दुचाकीही नेली. ही घटना चार दिवसांपूर्वीची असून शुक्रवारी त्या महिलेचा पती व आईने कळंब पोलिसात तक्रार दिली.

लातूरच्या कंत्राटदाराने शरद परिसरातील एका ऊसतोड मजुराच्या जबाबदारीवर २० जोडपे मजूर देण्याचा करार केला. कंत्राटदाराने यासाठी नऊ लाख रुपये मजुरांना इसार म्हणूनही दिले. सर्व मजुरांना दसऱ्याला घेऊन जाण्याचे ठरले. त्याचवेळी उर्वरित सहा लाख रुपये देण्याची बोलीही करण्यात आली. कंत्राटदार दसरा गेला, दिवाळी गेली तरी मजूर घेण्यासाठी आला नाही. त्यामुळे सर्व मजूर दुसरीकडे कामाला गेले. कंत्राटदार एका महिलेला सोबत घेऊन शरद गावात आला. त्याने ज्याच्या जबाबदारीवर मजुरांसोबत करार केला होता, त्याचे घर गाठले. त्याच्याकडे दोन दिवस मुक्कामी राहून मजुरांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. परंतु नोटरी केलेले मजूर दुसरीकडे कामाला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. 

"तक्रार घेऊन संबंधित महिलेचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते. महिला व ऊसतोड कंत्राटदाराशी संपर्क करण्यात येत आहे. प्रकरणाची सत्यता तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. "- राजेश राठोड, ठाणेदार कळंब

English
हिंदी सारांश
Web Title : Contractor Flees With Laborer's Wife and Bike: Kalamb Incident

Web Summary : A sugarcane contractor in Kalamb fled with a laborer's wife and his motorcycle after a labor agreement soured. The incident occurred four days prior, prompting a police complaint from the woman's husband and mother. Police are investigating the matter.
टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी