अंगणवाडी कर्मचाºयांचे असहकार आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:03 IST2017-08-26T23:02:28+5:302017-08-26T23:03:18+5:30
अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते.

अंगणवाडी कर्मचाºयांचे असहकार आंदोलन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते. ते आश्वासन पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. वर्धेत याचा शुभारंभ हिंगणघाट येथील बैठकीवर बहिष्कार टाकून करण्यात आला.
विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात मानधन वाढ करण्यात येईल, असे आश्वासन अंगणवाडी कर्मचाºयांच्या दिले होते. राज्यातील प्रमुख सात संघटनेच्या कृती समितीने शासनाने गठीत केलेल्या कमेटीला आपला अहवाल ७ जून रोजी सादर केला. आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून मानधन वाढीचे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी असहकार आंदोलन सुरु केले असून कुठल्याही शासकीय बैठकीत सहभागी होणार नाही. शिवाय त्या मासिक अहवालही देणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ११ सप्टेंबर पासून दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावार जातील अशी नोटीस त्यांनी दिली आहे.
वर्धा जिल्ह्यातील २,२०० कर्मचाºयांनी २२ आँगस्ट पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. समुद्रपूर व हिंगणघाट प्रकल्प अधिकारी यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तर बैठकीवर बहिष्कार करीत मासिक अहवाल देणार नाही, असे लिखीत दिले आहे. बिट व पीएचसी स्तरावरील बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ७०० महिलांना जून महिन्याचे मानधन मिळाले नाही. आँनलाईन मानधनाच्या चुकीच्या धोरणामुळे कमी मानधन खात्यात जमा करण्यात आले आहे. सर्व प्रकल्प कार्यालयातील लिपीक व अधिकारी यांना पीएफएमएस बाबत प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी आयटक नेते दिलीप उटाणे यांनी आयुक्त एकात्मीक बाल विकास सेवा योजना मुंबई यांच्या कडे केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विजया पावडे, वंदना कोळणकर, ज्ञानेश्वरी डंबारे, मंगला इंगोले, सुनंदा आखाडे, वंदना खोबरागडे, मैना उईके, रेखा काचोळे, रंजना तांबेकर, सुरेखा रोहनकर, माला भगत यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी केली आहे.