काऊंटडाऊन सुरू

By Admin | Updated: May 14, 2014 02:10 IST2014-05-13T23:49:11+5:302014-05-14T02:10:54+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे उमेदवारांसह साऱ्यांनाच वेध लागले आहे. जनतेने नेतृत्वाची धुरा कोणत्या उमेदवारांच्या खांद्यावर दिली आहे याचा निकाल

Continue to countdown | काऊंटडाऊन सुरू

काऊंटडाऊन सुरू

वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे उमेदवारांसह सार्‍यांनाच वेध लागले आहे. जनतेने नेतृत्वाची धुरा कोणत्या उमेदवारांच्या खांद्यावर दिली आहे याचा निकाल अवघ्या दोन दिवसात कळणार असून महिन्याभराची प्रतीक्षा आता संपणार आहे. या निकालासाठी प्रशासनाही सज्ज झाले आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघ आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि धामणगाव असे दोन विधानसभा मतदार संघ येतात. या सहाही मतदार संघातून २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. १0 एप्रिलला लोकसभा मतदार संघातील १५ लाख ६२ हजार 0७२ मतदारांपैकी १0 लाख १२ हजार १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून पसंतीच्या नेतृत्वाच भाग्य मशिनबंद केले.

स्ट्राँग रूममध्ये १६ रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून सहा मतदारसंघातील मतमोजणी एकाच ठिकाणी होणार आहे.

त्यासाठी तीन हॉल सज्ज करण्यात आले असून प्रत्येक हॉलमध्ये दोन मतदारसंघाची मतमोजणी सहायक, शिपाई आणि सुक्ष्म निरीक्षक असे चार अधिकारी देण्यात आले आहे. मतमोजणी, पर्यवेक्षक, समन्वय अधिकारी असे मिळून जवळपास ५५0 महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. सहाही मतदार संघातील मतदान केंद्रानुसार सरासरी २३ फेर्‍यात मतमोजणी होईल. सुरुवातील टपाल मतदान आणि नंतर इव्हीएम मशिनचे मतमोजणी केली जाईल. प्रत्येक फेरीनंतर मतदानाची आकडेवारी जाहीर केली जाईल. यात बदल झाला तर रात्री ८ वाजतापर्यंतही मतमोजणी सुरु राहण्याची शक्यता निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी वर्तविली आहे. मतमोजणी होणार असलेल्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: Continue to countdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.