शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

एक कंटेन्मेंट झोन तीन लाखाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM

कंटेन्मेंट झोन १४ दिवस राहत असल्याने ३०० मीटरच्या परिसराकरिता बांबुचे कठडे, टिनपत्रे लावण्यासाठी साधारणत: २५ हजार रुपये खर्च येतो. मजुरीकरिता ९ हजार आणि मंडप उभारणीचा साधारणत: १५ हजार रुपये असा जवळपास ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे शहरातील काही मंडप डेकोरेशनच्या व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देआरोग्यम् ‘अप’संपदा : बांधकाम विभागाचे अंदाजपत्रक आश्चर्यकारक, चौकशीची होतेय मागणी

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात १४ दिवस कंटेन्मेट झोन तयार करण्यात आले. या भागातील ३०० मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यासाठी टिनपत्रे व बांबूचा वापर करण्यात आला. सोबतच पोलीस कर्मचारी व नोडल अधिकाऱ्यांसाठी एक किंवा दोन मंडप उभारण्यात आले असून याचा खर्च तब्बल तीन लाख रुपये असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकावरुन निदर्शनास येत आहे. त्यामुळे या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोग्य्म ‘अप’ संपदा ठरत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ लागताच जिल्हा प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेल्या ३०० मीटरच्या परिसरात १४ दिवस कं टेन्मेंट झोन तयार केले जाते. ग्रामीण भागामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग तर शहरी भागातील जबाबदारी नगरपालिकेकडे सोपविण्यात आली आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन दिवसरात्र झटत आहे. ही महामारी रोखण्यासाठी शासनाने विकास कामांची गती कमी करुन शिल्लक असलेला निधी परत घेत कोविड-१९ च्या उपाययोजनांवर खर्ची घातला जात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने कमीत कमी खर्च करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ लाख ८५ हजार ते ३ लाखांपर्यंतचे अंदाजपत्रक तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. हे अंदाजपत्रक तयार करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उप विभागीय अभियंता व शाखा अभियंता यांचा हातभार लागला आहे. कंटेन्मेंट झोन तयार करण्यासाठी लागलेला हा मोठा खर्च पाहून अनेकांचे डोळे विस्फारले असून याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.आर्वी विभागाने काढली ११ लाखांची देयकेजिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातून झाला. तेव्हापासून जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वीमध्येच तयार झाले असून या ठिकाणी तब्बल ३ लाखांपर्यंत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शासकीय नियमानुसार आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्याकरिता ५ लाख ६० हजारांचे अंदाजपत्रक तयार करणे बंधनकारक असताना आतापर्यंत २० लाखांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता दिल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. विशेषत: ११ लाख रुपयांचे देयकही अदा करण्यात आले आहे. बांधकाम विभागाने कोणत्याही निविदा न मागविता अंदाजपत्रक तयार करुन मर्जीतील तीन कंत्राटदारांनाच कंत्राट दिल्याची चर्चा जिल्ह्याभरात सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात तक्रार झाल्याचीही माहिती आहे.आर्वी विभागातील कंटेन्मेंट झोनची व्याप्ती पाहूनच नियमानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी एका जागेवरील साहित्य दुसऱ्या जागेवर वापरण्यात आले आहे. त्यामुळे या विभागातील सर्वच अंदाजपत्रक ३ लाखापर्यंत गेलेले नाहीत. बरेच अंदाजपत्रक त्यापेक्षाही कमी किंमतीचे आहेत.सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वीवर्धा विभागात कंटेन्मेंट झोन तयार करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे आहे. झोन तयार करण्यासंदर्भातील अंदाजपत्रकही त्यांच्याकडूनच तयार केले जातात. आम्ही फक्त त्यांच्या सूचनेनुसार त्या परिसराचे मोजमाप करुन देतो.गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धासाहेब...! इतकाच खर्च अपेक्षितकंटेन्मेंट झोन तयार करण्यासाठी बांबू, टिनपत्रे यासह मंडप आणि मजुरी याचाच खर्च येतो. कंटेन्मेंट झोन १४ दिवस राहत असल्याने ३०० मीटरच्या परिसराकरिता बांबुचे कठडे, टिनपत्रे लावण्यासाठी साधारणत: २५ हजार रुपये खर्च येतो. मजुरीकरिता ९ हजार आणि मंडप उभारणीचा साधारणत: १५ हजार रुपये असा जवळपास ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे शहरातील काही मंडप डेकोरेशनच्या व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंटेन्मेंट झोनच्या तयार केलेल्या अंदाजपत्रकांत याचा खर्च २ लाख ८५ हजार ते ३ लाखापर्यंत दाखविण्यात आला आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा दर लावल्याने निधीचे वाटोळे झाले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या