शेतातील भाजी शेतकरीच पोहोचविणार थेट ग्राहकांपर्यंत
By Admin | Updated: September 16, 2014 23:56 IST2014-09-16T23:56:22+5:302014-09-16T23:56:22+5:30
शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी

शेतातील भाजी शेतकरीच पोहोचविणार थेट ग्राहकांपर्यंत
वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून वर्धेतील भाजीपाला गत महिन्यापासून नागपूर येथील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. याकरिता वर्धा जिल्ह्यातील अभिनव शेतकरी गटाला वाहन देण्यात आले आहे. या वाहनातून गटाशी संबंधीत असलेल्या शेतकऱ्यांची भाजी घेवून एक शेतकरी नागपूर येथे जावून ती थेट विकत आहे. यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे गटाचे शेतकरी विवेक वाघ यांनी सांगितले. नागरिकांना शेतातून निघालेली ताजी भाजी मिळत असल्याने भाजीचे हे वाहन दिसताच येथे गर्दी होते. शिवाय नागरिकांची आर्थिक बचतही होत आहे.
हिच पद्धत वर्धेत सुरू करण्यात येत आहे. याची माहिती भाजीउत्पादक शेतकऱ्यांना देण्याकरिता येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्यांना वाहनाची व यातून सुरू असलेल्या भाजी विक्रीची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. बऱ्हाटे यांनी दिली. यातून शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)