तालुक्यातील १० गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करा
By Admin | Updated: April 30, 2015 01:50 IST2015-04-30T01:50:21+5:302015-04-30T01:50:21+5:30
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बेढोणा ते पांजरा गोंडी या एकूण १५.४७ किमी रस्त्यांचे बांधकाम मंजूर आहे;

तालुक्यातील १० गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करा
आर्वी : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बेढोणा ते पांजरा गोंडी या एकूण १५.४७ किमी रस्त्यांचे बांधकाम मंजूर आहे; पण याच मार्गावरून जाणाऱ्या व तालुक्यातील दहा गावांची ये-जा असणाऱ्या बेढोणा ते चिंचोली (डांगे) दरम्यान असलेल्या दोन किमी रस्त्याचे बांधकाम वगळण्यात आले़ या मार्गावरचा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत़ या रस्त्यांचे बांधकाम त्वरित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
तालुक्यातील बेढोणा ते चिंचोली या दोन किमी लांबीच्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत़ हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गाने गुमगाव, पाचोड, हऱ्हासी, ब्राह्मणवाडा, तरोडा, चांदणी, तळेगाव, पानवाडी, पाचोड (ठाकूर), दहेगाव या दहा गावांतील शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची रहदारीच धोक्यात आली आहे़ पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे बांधकाम होणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांकरिता या मार्गाने बस धावते; पण खड्ड्यामुळे ती नियमित नाही़ याकडे लक्ष देत दहा गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली़(तालुका प्रतिनिधी)