कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निर्मिला दगडी किल्ला
By Admin | Updated: October 25, 2015 02:07 IST2015-10-25T02:07:45+5:302015-10-25T02:07:45+5:30
महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निर्मिला दगडी किल्ला
उपक्रम : विद्यार्थ्यांनी जाणले किल्ल्याचे महत्त्व, किल्ले रक्षणार्थ पुढाकार घेण्याचा निर्धार
वर्धा : महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांनी किल्ल्यांच्या रक्षणार्थ पुढाकार घ्यावा यासाठी किल्ले तयार करण्याचा उपक्रम शैक्षणिक उपक्रम कार्यानुभव विषयांतर्गत नंदोरी येथील जि. प. शाळेत राबविण्यात आला.
येथील शिक्षक अनिल कानकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यापासून किल्ले बनवून घेतले. यासाठी लागणारे साहित्य मुलांकडूनच गोळा करून त्यानुसार त्याची तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणातील छोटे-मोठे दगड गोळा करून मुरमी दगड, चुनखडक, माती, मुरूम, दगड आंदीविषयी माहिती व त्यांचे गुणधर्म जाणून घेत त्यानुसार किल्ला तयार केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निरनिराळे दगड व मुरुम मातीची ओळख झाली. तसेच यामुळे परिसराची स्वच्छता जोपासण्यासही मदत झाली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेला किल्ला सध्या गावात कौतुकाचा विषय ठरला. पालकांनीही शाळेत येऊन आपल्या पाल्यांनी तयार केलेला किल्ला पाहून समाधान व्यक्त केले. या उपक्रमात शाळेचे शिक्षक आर. एस. काळमेघ व दुष्यंत चौके यांनीही विद्यार्थ्यांना किल्ला निर्मितीत सहकार्य केले. शाळा समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी, केंद्रप्रमुख एन. एम. गिरडे व मुख्याध्यापक के.पी. शेळकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केले.(शहर प्रतिनिधी)