शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 5:00 AM

शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाजी आमदार तिमांडे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराच्या मध्य भागातून वर्धा नदीवर आजनसरा नॅशनल हायवे क्रमांक ७ नागपूर-हैदराबाद मार्ग जात असून संविधान चौक (कलोडे मंगल कार्यालय) ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्र सरकारच्या सी.आर.एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. वर्धा नदीवर आजनसरा, रोहिणी घाट, जागजई घाट, दापोली घाट, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे, वर्धा नदीवर हिवरा, तालुका हिंगणघाट, जि. वर्धा ते धानोरा, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे. तसेच वणा नदीवर लाडकी  ते नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम, पोथरा नदीवर काजळसरा ते मुरदगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करावे आदी मागण्यांचे निवेदन माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन  दिले. नागपूर - हैदराबाद महामार्ग क्रमांक ७ हिंगणघाट शहराच्या मध्य भागातून जातो. या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या, जड वाहने २४ तास चालतात. संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालय या भागात लोकांना चौकातून येणे-जाणे करावे लागते. भरधाव वाहनामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून, लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सातवर संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्राच्या सी. आर. एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. आजनसरा या गावाला लागून वर्धा नदीचे पात्र आहे. या भागातील शेतकऱ्यांची शेतीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात दापोरी, रोहिणी व जागजई या भागात आहे. वर्धा नदीवर वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. भक्तांना ये-जा करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करण्यासाठी वर्धा नदीच्या दापोरी घाट, रोहिणी घाट व जगजई घाट यापैकी कोणत्याही एका घाटावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भक्तांना ३० ते ४० किलोमीटरचा फेरा वाचू शकतो. वर्धा नदीवरील हिवरा ते धानोरा या नदीपात्राच्या महामार्गावर शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांना नदीच्या पात्रातून वहिवाट करावी लागते. नदीला पूर आल्यास अलीकडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामात खंड पडतो. परिणामी या सर्व शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaju Timandeराजू तिमांडे