‘त्या’ पुलाच्या बांधकामाला सुरूवात
By Admin | Updated: February 22, 2017 00:56 IST2017-02-22T00:56:27+5:302017-02-22T00:56:27+5:30
वडगाव ते सेलू या मार्गावरील पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने ही बाब वाहतुकीला डोकेदुखी ठरत होती.

‘त्या’ पुलाच्या बांधकामाला सुरूवात
झडशी : वडगाव ते सेलू या मार्गावरील पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने ही बाब वाहतुकीला डोकेदुखी ठरत होती. पावसाळ्याचे निमित्त करुन संबंधीत कंत्राटदाराने बांधकाम अर्धवट सोडले. पावसाळा संपला तरी बांधकामाला सुरूवात करण्यात येत नव्हती. याविषयी लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत करण्यात आले. याची दखल घेत या पुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळला आहे.
येथील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट स्थानिक कंत्राटदाराऐवजी नागपुर येथील कंत्रातदाराला देण्यात आले. त्यामुळे बांधकामावर देखरेख ठेवली जात नाही. सदर कंत्राटदार अनेकदा काम सुरू असताना गैरहजर असतो. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने येथून जाताना वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. हीच बाब हेरुन याबाबत लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत करण्यात आले. संबंधीत विभागाने याची दखल चौकशी केली. चौकशीनंतर पुलाचे अर्धवट बांधकम पूर्ण करण्यात येत आहे. बांधकामाला सुरवात केल्याने परिसरातील नागरिक दिलासा व्यक्त करतात.(वार्ताहर)