संविधान स्तंभ आला मोडकळीस
By Admin | Updated: November 1, 2015 02:32 IST2015-11-01T02:32:02+5:302015-11-01T02:32:02+5:30
सेलू येथील पंचायत समितीच्या आवारात काही वर्षांपूर्वी संविधान स्तंभ उभारण्यात आला होता.

संविधान स्तंभ आला मोडकळीस
गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्षच : येणारे नागरिक व्यक्त करतात आश्चर्य
वर्धा : सेलू येथील पंचायत समितीच्या आवारात काही वर्षांपूर्वी संविधान स्तंभ उभारण्यात आला होता. परंतु आजघडीला तो मोडून पडण्याच्या स्थितीत आहे. स्तंभाच्या दुरावस्थेकडे येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे सतत दुर्लक्ष होत आहे. स्तंभाची दुरवस्था पाहता तो किती काळ उभा राहिल हे सांगता येत नाही. पण येणारे जाणारे नागरिक मात्र ही दुरवस्था आश्चर्य व्यक्त करतात.
या स्तंभावर संविधान कोरलेले असून स्तंभावर तिरंगा आहे. याच स्तंभाकडे गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष जाईल असे कार्यालय आहे. तर स्तंभापासून अवघ्या २० ते २५ फुटावर पदाधिकाऱ्यांच्या सभा होतात ते सभागृह आहे. पंचायत समितीत जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या भेटी होतात. त्यांची वाहने सुद्धा या स्तंभाजवळील खाली जागेतच उभी केली जाते. असे असतानाही या स्तंभाकडे कुणाचे लक्ष कसे जात नाही हे न उलगडणारे कोडे आहे. पंचायत समितीची सभा विविध विषयावर गाजत असताना, नागरिकांनी केलेल्या अर्जाचा निपटारा करण्यास महिनोंगिनती काळ लागतो. कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार रामभरोसे असल्याचे गावागावाहून येणारे ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. लोकमत मध्ये या स्तंभाच्या दुरवस्थेविषयीचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले तेव्हा येथील गटविकास अधिकारी रजेवर होत्या. बातमी प्रकाशित होताच दुसऱ्या दिवशी सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एस. सडमाके यांनी दखल घेत अभियंता व कंत्राटदार यांना बोलावून त्या स्तंभाचा संगमवरी फलक बाजुला केला. पण त्या स्तभांची दोलायमान स्थिती पाहता तो नव्यानेच बांधावा लागतो. त्यामुळे उद्यापासून काम सुरू करू असे सांगितले होते. पण गटविकास अधिकारी कामावर रुजू झाल्यापासून त्या अद्यापही या विषयापासून अनभिज्ञ आहेत.
१५ आगस्टला ध्वजारोहण प्रसंगी याच स्तंभाजवळ उभे राहून ध्वजारोहण करण्यात आले, पण दुरवस्थेकडे कुणीही गांभिर्याने घेतले नाही. त्या स्तंभाची दुरुस्ती करणे गरेजेचे झाले आहे. पण ते पदाधिकाऱ्यांनी करायचे की अधिकाऱ्यांनी हे ठरविणेही गरजेचे झाले आहे. वारंवार कामाचा ताण असल्याचे आता तरी गटविकास अधिकारीस्तंभाच्या दुरुस्तीकडे लक्ष देतील का याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
अनागोंदी कारभाराचा परिचय
लोकमत मध्ये या स्तंभाच्या दुरवस्थेविषयीचे वृत्त प्रकाशित झाले तेव्हा येथील गटविकास अधिकारी रजेवर होत्या. बातमी प्रकाशित होताच दुसऱ्या दिवशी सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एस. सडमाके यांनी दखल घेत दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. पण गटविकास अधिकारी कामावर रुजू झाल्यापासून त्या या विषयापासून अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पं. स. मधील अनागोंदी कारभाराचा परिचय येतो.
मी रुजू झाल्यापासून स्तंभाच्या दुरवस्थेचा तसेच दुरुस्तीचा कसलाही विषय माझ्यापर्यंत पोहोचला नाही. पण मी चौकशी व पाहणी करून लवकरच स्तंभाच्या दुरुस्तीकडे लाक्ष देते. बांधकाम विभागाकडेही याची चौंकशी करते
- अनिता तेलंग, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सेलू.