शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सतत हात-पाय दुखणे अन् पायात मुंग्या? तुम्हाला आहे या आजाराचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:59 IST

Wardha : ३० वर्षे वयोगटातील तरुणाईत सायलेंट किलरचा धोका जास्त

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हाता-पायांना मुंग्या येणे, हे अगदी सामान्य लक्षण मानले जाते. सतत एका अंगावर झोपल्याने किंवा हात अंगाखाली आल्याने देखील हात-पायांना मुंग्या येतात आणि काही वेळाने त्या कमी होतात. म्हणून अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु हाता-पायांना मुंग्या येण्याची इतर अनेक कारणे आहेत. यामध्ये 'व्हिटॅमिन ई', 'व्हिटॅमिन बी'ची कमी, मधुमेह यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने सतत हाता-पायांना मुंग्या येतात. वाढलेल्या कोलेस्ट्रॉमुळे धोका असतो.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने या आजारांचा धोका

  • कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्त नसांमध्ये जमा होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलला वैद्यकीय भाषेत सायलेंट किलरदेखील म्हटले जाते.
  • आजच्या घडीला कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक आजाराचा धोका वाढलेला आहे. वयाची ३५ ते ४० वर्षे ओलांडल्यानंतर आपल्या आरोग्याची तपासणी करणेही गरजेचे आहे. अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्यास काय खाऊ नये तळलेले व भाजलेले पदार्थ, जास्त प्रमाणात तूर, मलाईचे पदार्थ, लाल मांस, मिठाई व गोड पेय, जास्त मीठ, फायबरयुक्त पदार्थ, फॅट असलेले पदार्थ व प्रोटिनयुक्त पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये, असे डॉक्टरांचे सांगणे आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे काय? शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हात-पाय सुन्न पडतात. डोळ्याजवळ गाठ निर्माण होते; तसेच जिभेचा रंगही बदलतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरातील मेणासारखा असणारा हा पदार्थ शरीरातील रक्त गोठवतो. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा सायलेंट किलर अटॅकचा धोका उदभवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हाता-पायांना नेहमी मुंग्या येणे हे स्वाभाविक असले तरी त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेवुन उपचार करणे आवश्यक आहे. 

"आजार होण्यापूर्वी काही लक्षणे जावतात. ते आपल्या ओळखता आले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलमुळे सायलेंट किलर अटॅकचा धोका असतो."- डॉ. अंकुश कावलकर, जनरल फिजिशियन, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धाHealthआरोग्य