शेतकरी समर्थनार्थ काँग्रेसचे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:55 IST2018-06-11T22:55:25+5:302018-06-11T22:55:35+5:30

शेतकरी समर्थनार्थ काँग्रेसचे रास्तारोको
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांच्या मागण्याकडे वेधण्यासाठी दोन तास आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना रामभाऊ सातव म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही असे त्यांनी सांगितले. आंदोलनात अंकुश पिंपरे, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, भक्तराज अलोणे, नरेंद्र गुजर, प्रल्हाद गिरीपुंजे, सुभाष देशमुख, राजेंद्र गवळी, रमेश खेडकर, सुधाकर घाडगे, सुरेश बोरकर, ज्ञानेश्वर वैद्य, राजकुमार बारी, रमेश गुरनुले आदी सहभागी झाले होते.
या आहेत मागण्या
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांना मोफत पीक विम्याचे कवच देण्यात यावे, शेतीला पुरक व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावे, महागाई नियंत्रणात आणण्यात यावी, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यात यावे, बोंडअळी, गारपीट आदीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी, शेतकºयांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविले.