शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेस छेडणार आणखी एक स्वातंत्र्यता संग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 23:47 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ठपका ठेवत या विरोधात आणखी एक नवा स्वातंत्र्यता संग्राम छेडण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. यासाठी काँग्रेस महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालणार असून सोबतीला माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याचाही आधार घेणार आहे.

ठळक मुद्देसेवाग्राममधील काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत ठराव पारित गांधींच्या मार्गावरच चालणार, शास्त्रींच्या नाऱ्यावरही जोर संघ व भाजपावर तिरस्कार व फूट पाडण्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ठपका ठेवत या विरोधात आणखी एक नवा स्वातंत्र्यता संग्राम छेडण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. यासाठी काँग्रेस महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालणार असून सोबतीला माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याचाही आधार घेणार आहे.सेवाग्राम येथील सर्व सेवा संघाच्या महादेव भाई भवनात मंगळवारी अ.भा. काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह कार्यसमितीतील सुमारे ५३ नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रारंभी काँग्रेस नेते के.के. धवन व गुरुदास कामत यांना शोक प्रस्ताव घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दोन महत्वपूर्ण ठराव पारीत करीत २०१९ च्या निवडणुकीच्या रणणितीवर चर्चा करण्यात आली.बैठकीत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांना आत्मसात करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पारित झालेल्या प्रस्तावांची माहिती दिली. भाजपा व संघ परिवाराने गांधी विचारधारेचा विरोध केला. आता सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी हे लोक सोंग घेऊन गांधींपुढे हात जोडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मोदी सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करून ध्रुवीकवरण करीत आहे. लोकांचा आवाज दाबण्याचे त्यांचे विचार आहेत. यांना देशात अराजकता माजवायची आहे. फक्त द्वेशाचे राजकारण केले जात आहे. या सर्व चक्रातून देशाला मु्क्त करण्यासाठी काळाजी गरज विचारात घेता एक नवा स्वातंत्र्य संग्राम सुरू केला जाईल व यात पूर्णपणे यश मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार करणारा ठराव बैठकीत पारित करण्यात आला.शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत दुसरा प्रस्ताव पारित करीत शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारकडून शेतकºयांची होत असलेली फसवणूक व त्यांच्यावर होणाऱ्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. डिझेल व खतांचे वाढते भाव, जीएसटी यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतमालाला भाव मागण्यासाठी, मोदींना त्यांनी दिलेल्या दीडपट हमीभावाच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांवर सरकारने लाठ्या चालविल्या, अश्रू धुराच्या नळकांड्या फेकल्या. शेतकºयांवरील हा अत्याचार काँग्रेसला मान्य नाही. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस नेहमी कटिबद्ध असेल, असा ठराव घेत काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.भाजपा गोडसे विचाराची समर्थक भाजपातर्फे गांधी जयंती साजरी करण्यात येत असल्यावर टीका करीत सुरजेवाला म्हणाले, सत्य व सद्भावनेची गांधी विचारधारा जीवनात आत्मसात करणे कठीण आहे. राजकीय फायद्यासाठी गांधींच्या चष्म्याचा भाजपाने वापर केला. सत्तालालसेपोटी गांधींच्या नावाचा वापर करणारे हे लोक गांधींचे विचार मात्र कधीच आत्मसात करू शकत नाहीत. कारण ते गांधींची हत्या करणाऱ्या नाथुराम गोडसेच्या विचारांचे समर्थक आहेत.राहुलसंग सेल्फी,सोनियाने हात मिळविला कार्यसमितीच्या बैठकीनंतर राहुल व सोनिया गांधी या महादेव बवनातून बाहेर पडल्या. गाडीत बसत असताना तेथे उपस्थित महिला व विद्यार्थीनींना पाहून राहुल व सोनिया गांधी हे सुरक्षा घेरा तोडत त्यांच्याकडे चालत गेले. दोन्ही नेत्यांनी महिलांशी हस्तांदोलन केले. राहुल यांनी तर चक्क मराठीत ’तु्म्ही कसे आहात’ अशी विचारणा केली. कस्तूरबा रुग्णालयातील कर्मचारी रोशनी मेंढे यांनी राहुल यांच्यासोबत सेल्फी काढून घेतली. छाया बलबीर, उज्जवला, मनीषा आदी राहुल यांचा साधेपणा पाहून भारावून गेल्या. याच वेळी तेथे आईसोबत असलेल्या एका चिमुकल्याला राहुल गांधी यांनी कडेवर घेतले, तर गाडीत बसताना एका चिमुकलीलाही मांडीवर बसविले. त्या कुटुंबानेही राहुल गांधींसोबत फोटे काढून घेतला. 

टॅग्स :congressकाँग्रेसSewagramसेवाग्राम