दोन जागी भाजप तर एकावर काँग्रेसला कौल

By Admin | Updated: February 24, 2017 02:13 IST2017-02-24T02:13:55+5:302017-02-24T02:13:55+5:30

जि.प., पं.स. निवडणुकीच्या निकालांनी सर्वांना धक्काच दिला. काँग्रेसचा हिरमोड झाला तर भाजपाला दोन जागा मिळाल्या.

Congress in two places, Congress on one side | दोन जागी भाजप तर एकावर काँग्रेसला कौल

दोन जागी भाजप तर एकावर काँग्रेसला कौल

पंचायत समितीवर भाजपाचाच पगडा
आष्टी (श.) : जि.प., पं.स. निवडणुकीच्या निकालांनी सर्वांना धक्काच दिला. काँग्रेसचा हिरमोड झाला तर भाजपाला दोन जागा मिळाल्या. काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. पं.स.वर ६ पैकी ४ जागांवर भाजप तर दोन जागांवर काँगे्रस विजयी झाली. गत ३५ वर्षांपासून सतत निवडून येणारे रमेश वरकड यांना अवघ्या ८५ मतांनी पराभव पत्करावा लागला. गड आला; पण सिंह गेला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
साहुर जि.प. गटात भाजपाच्या छाया घोडीले यांनी काँग्रेसच्या अर्चना घोरपडे यांना ६६३ मतांनी पराभूत केले. बसपाच्या वंदना दंडाळे यांना ६७९ मते मिळाली. त्या नसत्या तर चित्र बदलले असते. चुरशीच्या लढतीत भाजपला विजय मिळाला. लहानआर्वी गटात काँग्रेसचे त्रिलोकचंद कोहळे यांनी भाजपाचे कमलाकर निंभोरकर यांना ७७७ मतांनी पराभूत केले. राष्ट्रवादीचे राजेश ठाकरे यांना २१९१ मते मिळाली. भाजपाचे निंभोरकर दहाव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. भाजप बंडखोर राजेश ठाकरे राष्ट्रवादीकडून लढले. ही भाजपच्या पराभवाची बाब ठरली. याकडे सर्वांचे लक्ष होते. तळेगाव जि.प. गटात भाजपच्या अंकीता होले यांनी काँग्रेसच्या सुनीता इंगळे यांना ४३० मतांनी पराभूत केले. येथे काँग्रेस विजयी होणार, असा सूर होता; पण ‘लोकमत’ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला.
लहानआर्वी पं.स. गणात भाजपाच्या निता होले, अंतोरा गणात भाजपच्या रेखा योगेंद्र मतले विजयी झाल्या. मतले अवघ्या १४ मतांनी विजयी झाल्या. येथे जि.प. काँग्रेस तर दोन्ही पं.स. गण भाजपला गेल्या. साहुर पं.स. गणात काँगे्रसचे इश्वर वरकड विजयी झाले. त्यांनी ३५ वर्षांपासून सतत निवडून येणारे भाजपचे रमेश वरकड यांना ८५ मतांनी पराभूत केले. माणिकवाडा गणात भाजपाचे गोविंदा खंडाळे, भारसवाडा गणात काँग्रेसचे राजेंद्र चौधरी विजयी झाले. बंडखोर अजय लोखंडेमुळे येथे काँग्रेसचा विजय झाला. तळेगाव पं.स. गणात चौरंगी लढत झाली. यात भाजपच्या हेमलता भगत विजयी झाल्या. मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सीमा गजभिये, नायब तहसीलदार मृदुलता मोरे, गणेश सोनवणे यांनी यशस्वी पार पाडली. ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी बंदोबस्त ठेवला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress in two places, Congress on one side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.