काँग्रेस व राकाँची सत्ता अबाधित

By Admin | Updated: July 10, 2015 00:16 IST2015-07-10T00:16:19+5:302015-07-10T00:16:19+5:30

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने १६ पैकी १५ जागांवर एकतर्फी ताबा मिळवित आपली सत्ता अबाधित राखली.

Congress and Rakanchi power unrestricted | काँग्रेस व राकाँची सत्ता अबाधित

काँग्रेस व राकाँची सत्ता अबाधित

पुलगाव एपीएमसीत भाजपाला भोपळा
देवळी : पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने १६ पैकी १५ जागांवर एकतर्फी ताबा मिळवित आपली सत्ता अबाधित राखली. या निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्याची इच्छा बाळगणारा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपा गटाची चांगलीच दाणादाण उडाली. त्यांना येथे भोपळाही फोडता आला नाही. केवळ मापारी-हमाल गटातील एक जागा तिवारी गटाच्या ताब्यात गेली.
देवळी तालुक्यात आठ केंद्रावरून या बाजार समितीकरिता मतदान घेण्यात आले. यात ९६ टक्के मतदान झाले. त्याची गुरुवारी देवळी येथील श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्यावेळी भाजपाचे खासदार रामदास तडस, काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री रणजित कांबळे, जिल्ह्याचे सहकार नेते तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती तसेच भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी याकरिता भाजपाच्यावतीने खासदार रामदास तडस यांनी संपूर्ण विधानसभा मतदार संघ पिंजून काढला होता. यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. मात्र त्याचा कुठलाही लाभ झाला नसल्याचे जाहीर झालेल्या निकालावरून दिसत आहे.

Web Title: Congress and Rakanchi power unrestricted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.