संगणक शिक्षक बेरोजगारीच्या उंबरठ्यावर

By Admin | Updated: March 1, 2016 01:31 IST2016-03-01T01:31:16+5:302016-03-01T01:31:16+5:30

महाराष्ट्र शासन पुरस्कृत आयसीटी संगणक शिक्षक फेज-२ ला २०११ रोजी सुरुवात झाली.

Computer teacher unemployment near the threshold | संगणक शिक्षक बेरोजगारीच्या उंबरठ्यावर

संगणक शिक्षक बेरोजगारीच्या उंबरठ्यावर

सेवेत कायम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर
वर्धा : महाराष्ट्र शासन पुरस्कृत आयसीटी संगणक शिक्षक फेज-२ ला २०११ रोजी सुरुवात झाली. याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. पण सदर कंपनीचे कंत्राट येत्या मे महिन्यात संपुष्ठात येत आहे. यामुळे राज्यातील हजारो संगणक शिक्षक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहे.
विद्यार्थ्याना संगणक साक्षर करण्यासाठी मोहीम राबवित संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन पुरुस्कृत आयसीटी संगणक शिक्षक यांची नियुक्ती केली. एका खासगी कंपनीला या संगणक साक्षरतेचे कंत्राट देण्यात आले. पण मे महिन्यात सदर कंत्राट संपण्याच्या मार्गावर आहे. वर्धा जिल्ह्यात जवळपास ७२ तर राज्यभरात ८ हजार शिक्षक कार्यरत आहेत. कंत्राट संपणार असल्यामुळे हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार आहे. त्यामुळे या आयसीटी संगणक शिक्षकांना सेवेत कायम करावे, अशी मागणी संघटनेद्वारे शासनाला केली जात आहे. विशेष म्हणजे पंजाब, हरियाणा आणि गोवा या तिन्ही राज्यात अश्या शिक्षकांना सेवेत कायम केले आहेत. हाच नियम राज्यात ही लागू करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यशासनाला करण्यात आली आहे. सदर मागणी साठी महाराष्ट्र सर्व श्रमीक संघटना आणि आयसीटी संगणक शिक्षक संघटनेद्वारे ९ मार्चला मुंबई येथे आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Computer teacher unemployment near the threshold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.