जलयुक्त शिवारची १२७ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:25 IST2017-11-28T22:24:25+5:302017-11-28T22:25:07+5:30

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे.

Completed 127 works of submerged shire | जलयुक्त शिवारची १२७ कामे पूर्ण

जलयुक्त शिवारची १२७ कामे पूर्ण

ठळक मुद्देरबी हंगामाला फायदा : पाण्याच्या पातळीतही वाढ

आॅनलाईन लोकमत
आर्वी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे. या अभियानातून आर्वी तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने नाला खोलीकरण, ढाळीचे बांध तयार करण्याकरिता युद्धपातळीवर कामे हाती घेतली. तालुक्यात २०१६-१७ यावर्षात १२७ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रस्तावित आहे. या कामातून जलसाठ्याचा लाभ आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला असून सध्या रबी हंगामातील गहू व चना या पिकासाठी त्याचा लाभ होत आहे.
आर्वी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१६-१७ कृती आराखड्यात आर्वी तालुक्यात एकूण १४१ कामे जलयुक्त शिवारची प्रस्तावित होती. त्यापैकी १२७ कामे पूर्ण करण्यात आली. यात नाला खोलीकरणाचे ७१, ढाळीचे बांध ५६ तर तुटफुट दुरूस्तीची आठ कामे करण्यात आली. या जलयुक्त शिवारच्या सर्व कामामध्ये गावातील विहिरी व नाल्याची पाणी पातळी वाढल्याने त्याचा तालुक्यातील रबी हंगामातील चना व गहू पिकाला चांगलाच फायदा होत आहे.
तालुक्यातील पाचेगाव, बेढोणा, पाचोड (ठाकूर), सावंगी (पोळ), पारगोठाण, दिघी, देऊरवाडा, खर्राशी, जामनेरा, बोडाळा, तरोडा, टाकळी, बोदड, हिवरा (तांडा), बोथली, हर्राशी, परसोडी, टेंभरी, गौरखेडा, बोथली (नटाळा), रामपूर, सुकळी, हमदापूर, हिवरा या २५ गावांत जलयुक्त शिवार कामाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे रबी हंगामातील शेतपिकांना चांगला लाभ मिळत आहे. यात ही सर्व जलयुक्त कामे ही आर्वी तालुक्यातील पाणीटंचाई व डार्क झोनमध्ये येणाऱ्या गावात करण्यात आल्याने शेतकºयाच्या रबी हंगामातील शेतपिकांना चांगलाच फायदा होत आहे.

जलयुक्त शिवार योजनेतून आर्वी तालुक्यातील २५ गावांत कामे करण्यात आली. या कामामुळे शेतकऱ्यांच्या रबी हंगामातील शेतपिकांना चांगला फायदा होत आहे.
- के.बी. घोडके, सहायक तालुका कृषी अधिकारी, आर्वी.

Web Title: Completed 127 works of submerged shire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.