शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साडी अन् भांडी वाटपाची तक्रार महिलांमध्ये रोष, राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:58 IST

Wardha : भाजप-काँग्रेस उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गटाच्या सदस्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशनअंतर्गत काम करणाऱ्या ब्लॉक व्यवस्थापक, क्लस्टर को-ऑर्डिनेटर यांच्यामाध्यमातून विरोधी उमेदवार भांडी, साडी वाटप करीत असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. यावरून आता चांगलेच राजकारण तापले असून दोन्ही बाजूंकडून वार, प्रतीवार करण्यात येत आहे.

शेखर शेंडे यांनी तक्रारीतून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स महिला बचत गटाच्या सदस्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशनअंतर्गत काम करणाऱ्या ब्लॉक व्यवस्थापक, क्लस्टर को-ऑर्डिनेटर यांच्यामार्फत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दबावात भेटवस्तू वाटप होत असल्याचे तक्रारीत नमूद केले. मात्र, या महिलांनी असा कुठलाही प्रकार होत नसल्याचे सांगितल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. महिलांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा मिळत असल्याने हेतूपुरस्सर आरोप व तक्रार करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्यांनीच ही बाब सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्याने नोडल अधिकाऱ्यांनी वर्धा व सेलू येथील महिला व बाल कल्याण विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापकांना पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे तक्रारकर्ते आपली तक्रार अंगणवाडी सेविका, आशा वर्कर किंवा बचत गट सदस्यांविरुद्ध नसून, संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध असल्याचे सांगत आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्यांनीच आपल्याकडे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केली होती, असा त्यांचा दावा आहे. या तक्रारीमुळे सध्या वातावरण चांगलेच तापले आहे.

सत्ताधारी म्हणतात, महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे, तर विरोधक म्हणतात, आम्ही महिलांची बाजू घेऊनच तक्रार केली आहे. तसेच अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. यावरून चांगलेच वादंग सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा वाद राजकीय परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. या वादात पुढे काय होते, याकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwardha-acवर्धा