विद्यार्र्थिंंनींच्या संरक्षणार्थ शाळा,महाविद्यालयांत तक्रार पेट्या
By Admin | Updated: October 30, 2015 02:41 IST2015-10-30T02:41:27+5:302015-10-30T02:41:27+5:30
शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांची नोंद घेऊन नगर परिषद तथा पोलीस स्टेशन याचा संयुक्त विद्यमाने सर्व शाळा व कॉलेजमध्ये ....

विद्यार्र्थिंंनींच्या संरक्षणार्थ शाळा,महाविद्यालयांत तक्रार पेट्या
न.प. व पोलीस स्टेशनचा उपक्रम : गोपनीय तक्रारींची ठाणेदार स्वत: घेणार दखल
हिंगणघाट : शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांची नोंद घेऊन नगर परिषद तथा पोलीस स्टेशन याचा संयुक्त विद्यमाने सर्व शाळा व कॉलेजमध्ये तक्रार पेटी लावून गोपनीय तक्रारीची दखल घेण्याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला.
नगर परिषदेच्या क्षेत्रातील जी.बी.एम.एम. मोहता हायस्कूल, सेंटजॉन कॉन्व्हेंट, डॉ.बी. आर. आंबेडकर महाविद्यालय, आर.एस. बिडकर येथे पोलीस निरीक्षक एम. एम. बोडखे, नाईक व नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्याहस्ते तथा उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, शिक्षण सभापती अनिल भोंगाडे व मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक एम. एम. बोडखे यांनी शहरामध्ये होत असलेल्या मुलींच्या छेडखानीच्या घटना, ब्लॅकमेलिंग, मोबाईल द्वारे चित्रीकरण तथा अश्लील संदेश पाठवणे याची गोपनीय याची तकार या पेटीमध्ये मुलींनी करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तक्रार पेटीमध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीची दखल दर आठवड्याला ठाणेदार स्वत: घेणार आहे. हा तपास पूर्णत: गोपनीय पद्धतीने होणार आहे. तसेच तक्रार कर्त्यांचे नाव कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासनातर्फे उघड न करता गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक बोडखे यांनी शहरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांना, कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची असल्यास या तक्रार पेटीचा उपयोग करावा, असे आवाहन केले. या तक्रार पेटीचा उपयोग शहरातील जानकार नागरिकांनी तथा विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांनी घ्यावा व अवैध वागणुकीला आळा घालण्यास मदत करावी, असे आवाहन नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी तसेच नगर परिषदेचे शिक्षण विभागातील जी. टी. टेंभुर्णे, डेकाटे उपस्थिती होते.(तालुका प्रतिनिधी)