‘त्या’ शिक्षकाविरोधात महिलांची तक्रार

By Admin | Updated: February 13, 2016 01:35 IST2016-02-13T01:35:38+5:302016-02-13T01:35:38+5:30

वर्धा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नेरी (पुनर्वसन) येथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना एका शिक्षकाने उपस्थित गावातील महिलांसमक्ष अर्वाच्च शब्दांचा वापर केला.

Complaint against women 'teacher' | ‘त्या’ शिक्षकाविरोधात महिलांची तक्रार

‘त्या’ शिक्षकाविरोधात महिलांची तक्रार

सीईओंना साकडे : सांस्कृतिक कार्यक्रमात केला अर्वाच्च शब्दांचा वापर
वर्धा : वर्धा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नेरी (पुनर्वसन) येथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना एका शिक्षकाने उपस्थित गावातील महिलांसमक्ष अर्वाच्च शब्दांचा वापर केला. यामुळे महिलांचा अपमान झाला, असा आरोप करीत गावातील महिलांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे ‘त्या’ शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली यात सदर शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे
महिलांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार, नेरी (पुनर्वसन) येथे सांंस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दहेगाव (मिस्कीन) या शाळेतील नाटीका सादर होण्यापूर्वी प्रास्ताविक करण्याकरिता त्या शाळेतील अजय मोरे नामक शिक्षक आले. त्यांनी येथे बोलताना काही अर्वाच्च शब्दांचा वापर केला. यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही महिला शिक्षकांचीही उपस्थिती होती. या शिक्षकाच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शिक्षकावर कारवाई करण्याच्या मागणीकरिता थेट जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. शिक्षकाने केलेल्या वक्तव्याच्या वेळी मंचावर पंचायत समितीच्या सभापती कुंदा भोयर व येथील गटशिक्षणाधिकारी कोडापे यांची उपस्थिती होती.
या शिक्षकावर कारवाई करण्याकरिता गावातील महिलांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवदेन सादर केले आहे. यात शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आहेत. या स्पर्धा संपताच पंचायत समिती स्तरावर या शिक्षकाची तपासणी होणार आहे. महिलांची तक्रार असल्याने हा प्रकार गांर्भियाने घेतला जाणार असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.(प्रतिनिधी)
दहेगाव (मिस्कीन) शाळेची नाटिका सुरू होण्यापूर्वी शाळेचे शिक्षक अजय मोरे प्रास्ताविक करण्याकरिता आले. यावेळी त्यांनी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. यामुळे महिला नाराज झाल्या. या विरोधात त्यांनी तशी तक्रार दाखल केली आहे. कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आटोपल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- संतोष कोडापे, गटशिक्षणाधिकारी, वर्धा

Web Title: Complaint against women 'teacher'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.