स्वगावी येताय? एवढे कराच, कोरोनाचे टळेल संक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:17+5:30
विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ्रमात राहू नका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्तीला कोरोना झालाय, असे समजूनच काळजी घ्या.

स्वगावी येताय? एवढे कराच, कोरोनाचे टळेल संक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे, तेव्हा स्वगावी येताय तर काही नियम पाळायलाच हवे, तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू शकू, असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे.
स्वगावी वर्ध्यात येताना चोरट्या मार्गाने येऊ नका तर राजरोसपणे या, गाव आमचे-तुमचे असल्याने प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा, नक्कीच तुमचे स्वागत होईल. केवळ १५ दिवस विलगीकरणात रहा, या काळात घरातील कुणालाही स्पर्श करू नका, वस्तूंचा एकत्रित वापर करणे टाळा, किराणा, भाजीपाला धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज भासली तर मोबाईलवरून संपर्क करून सांगा अथवा लांबूनच हाक मारा, विलगीकरणात राहिले म्हणजे गावातील नागरिकांना तुमचा अभिमान वाटेल, शेजारी व इतर तुम्हाला पैसे नसतील तरी हवी ती मदत करतील. विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ्रमात राहू नका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्तीला कोरोना झालाय, असे समजूनच काळजी घ्या. या संपूर्ण बाबींचे पालन केले तर आपण कारोनाविरुद्धचा लढा सहजपणे जिंकू शकू, असे प्रा. गमे यांनी म्हटले आहे.