विद्यार्थ्यांनी केले ‘नेट’ प्रमाणपत्राचे दहन
By Admin | Updated: November 7, 2015 02:10 IST2015-11-07T02:10:40+5:302015-11-07T02:10:40+5:30
नॉन नेट फेलोशिप बंद करण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाविरोधात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या नेट प्रमाणपत्राचे सामूहिक दहन केले.

विद्यार्थ्यांनी केले ‘नेट’ प्रमाणपत्राचे दहन
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आंदोलन
वर्धा : नॉन नेट फेलोशिप बंद करण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाविरोधात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या नेट प्रमाणपत्राचे सामूहिक दहन केले.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने नॉन नेट फेलोशिप बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातील विविध केंद्रीय विद्यापीठात संशोधन करीत असलेले विद्यार्थी परंतु नेट उत्तीर्ण नसलेले विद्यार्थी मुकणार आहे. फेलोशिप अभावी त्यांना संशोधन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी १५ दिवसांपासून अनेक शोधार्थी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग भवनासमोर आंदोलनास बसले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देत महात्मा गांधी विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी येथील नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या नेटच्या प्रमाणपत्राचे विद्यापीठात दहन केले. यावेळी विद्यापीठ आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणा देत हा अन्यायकारक निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी लावून धरली.(शहर प्रतिनिधी)