खादीच्या प्रसारासाठी ‘कलर्स् आॅफ इंडिपेन्डंट’ उपक्रम
By Admin | Updated: August 11, 2016 00:31 IST2016-08-11T00:31:08+5:302016-08-11T00:31:08+5:30
खादीच्या प्रचार व प्रसार या उद्देशपूर्तीसाठी ‘कलर्स आॅफ इंडिपेन्डंट’ हा उपक्रम क्रांती दिन ...

खादीच्या प्रसारासाठी ‘कलर्स् आॅफ इंडिपेन्डंट’ उपक्रम
स्वातंत्र्याची ७० वर्षे : क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आयोजन
सेवाग्राम : खादीच्या प्रचार व प्रसार या उद्देशपूर्तीसाठी ‘कलर्स आॅफ इंडिपेन्डंट’ हा उपक्रम क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत महात्मा गांधी आश्रम परिसरात सुरू करण्यात आला आहे. आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी ‘लिव्ह फॉर अदर्स’ तर अधीक्षक भावेश चव्हाण यांनी ‘गांधी चरखा इज स्पीरीट आॅफ इंडिया’ असे लिहून या उपक्रमास प्रारंभ केला.
‘मिनीस्ट्री आॅफ टेक्सटाईल्स गव्हर्नमेट आॅफ इंडिया’ यांच्या ‘स्वातंत्र्याची ७० वर्षे’ या कार्यक्रमांतर्गत खादीबाबत आपले विचार व मनोगत लिखानातून मांडावयाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून खादी विचार जोपासण्याचे काम सुरू आहे. खादी स्वावलंबनाचे प्रतिक असले तरी लाखो लोकांना अहिंसक रोजगार उपलब्ध करून ग्रामीण उत्थानासाठी हातभार लावण्याचे काम खादीच्या माध्यमातून होत आहे. खादीला अधिक चालना मिळावी, जनतेपर्यंत ती पोहोचावी, हा यामागील उद्देश आहे.
उपक्रमाचे संचालन पन्नालाल यांनी केले. याप्रसंगी दीपक पटोले, शैलेंद्र तिवारी, गजानन पांडे, शिवाजी पंडित, संजय यादव, राज, प्रशांत येनकर, भावना डगवार आदी उपस्थित होते.(वार्ताहर)