ए २ दूध संकलन करुन विक्री करणे फायद्याचे
By Admin | Updated: October 27, 2016 00:49 IST2016-10-27T00:49:01+5:302016-10-27T00:49:01+5:30
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ लाडकी हद्दीतील मानोरा या गावामध्ये दत्तक गाय योजना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

ए २ दूध संकलन करुन विक्री करणे फायद्याचे
सतीश राजू : मानोरा येथे दत्तक गाय योजना मार्गदर्शन शिबिर
वर्धा : हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ लाडकी हद्दीतील मानोरा या गावामध्ये दत्तक गाय योजना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये एकूण ६७ गायींची नोंदणी करण्यात आली. ए २ दूध संकलन करुन त्याची विक्री करणे अधिक फायद्याचे असल्याची बाब जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी पशुपालकांना पटवून दिली.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. आर.एम. भोजने, वर्धा हे होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जि.प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, विशेष अतिथी म्हणून पशुधन विकास अधिकारी शशीकांत मांडेकर, हिंगणघाट, डॉ. पी.आर. वानखडे, सरपंच लक्ष्मीकांत सेनाड मंचकावर उपस्थित होते.
डॉ. सतीश राजू यांनी गायीबाबतचा श्रीकृष्णाच्या काळातील इतिहास सांगून ए २ दुधाच्या गणुवत्तेबाबतची माहिती देण्यात आली. ए २ दूध संकलन व विक्रीकरिता गावामध्ये संघटन स्थापन करण्याचे आवाहन केले. गावठी गायींचे गोमुत्र शहरामध्ये १० रूपये लिटरप्रमाणे विकल्या जाते. तसेच त्या गोमुत्रापासून गोमुत्र अर्क कसा तयार केला जातो, किती लिटर गोमुत्रापासून एक लिटर गोमुत्र अर्क तयार होतो. ते मार्केटमध्ये १५० रू. ते २०० रू प्रति लिटर भावाने विकला जातो. तसेच शेणापासून गवरी बनवून त्या शहरामध्ये विकल्या जाते. गावठी गायीचे दूध जरी कमी असले तरी त्याच्यापासून मिळारे मुत्र व शेण हे सुद्धा उपयोगी आहे. हे गोपालकांना पटवून दिले. गायीसाठी हिरवी वैरण कशी तयार करावी त्याचे नियोजन सांगितले. वैरणीच्या जातीची माहिती दिली. पशुवैद्यकीय दवाखाना लाडकी येथे वैरण ७ जाती आहे. त्याचे विनामुल्य थोंबे वाटप करीत असतात. याबाबत माहिती दिली. देवलापार येथे विनामुल्य प्रशिक्षणाची माहिती दिली. वैरणीबाबत अल्लीपूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक लोकांची यादी करण्याच्या सूचना डॉ. प्रदीप थुल यांना देण्यात आल्या.
संस्थाप्रमुख डॉ. प्रदीप थुल यांनी १८१ जनावरांचा विमा काढून गोपालकांना लाभ दिला. त्याबद्दल डॉ. सतीश राजू व डॉ. आर.एम. भोजने यांनी त्याचे कौतुक केले. त्या पशुविमा पॉलिसीचे वाटप डॉ. सतीश राजू, डॉ. भोजने, डॉ. मांडेकर, डॉ. वानखडे, सरपंच सेनाड या मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. डॉ. आर.एम. भोजने यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये गोपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व काही अडचणी आल्यास वरिष्ठासोबत संपर्क करावा, अशा सूचना केल्यात. प्रास्ताविक डॉ. मांडेकर यांनी केले. डॉ. पी. आर. वानखेडे यांनी या योजनेबाबत माहिती दिली. संचालन व आभार डॉ. प्रदीप थुल यांनी केले. याप्रसंगी गावातील नवयुवकांसह प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनिल दरणे, समीर जोगवे, प्रमोद दिवे, दिवाकर धोटे, मनोहर सूर, गजानन जोगवे, किशोर कोल्हे, छत्रपती घुगरे, प्रवीण राऊत, विनोद राऊत, सोपान दिवे, सुरेश दिवे, कैलास जोगवे, अधिकराव जोगवे, हरिभाऊ जोगवे, विजय राऊत, बंडुजी सातपुते, योगेश्वर उसरे, देवराव राऊत, आनंद जोगवे, नरेंद्र रघाटाटे, शंकर हिवरकर, विठ्ठल हिवरकर, राजू रघाटाटे, दादाजी रघाटाटे, राजू जोगवे, विठ्ठल रघाटाटे, लटारी रघाटाटे, भीमराव भुजाडे, सुखदेव शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)