अनधिकृत शिकवणी वर्ग बंद करा

By Admin | Updated: February 12, 2016 02:38 IST2016-02-12T02:38:30+5:302016-02-12T02:38:30+5:30

शहरात शासकीय सेवेत असताना अवैध खासगी शिकवणी वर्ग घेतले जात आहे. अशा दुहेरी शिक्षकांचे अनधिकृत शिकवणी वर्ग त्वरित बंद करावे, ....

Close unauthorized tuition classes | अनधिकृत शिकवणी वर्ग बंद करा

अनधिकृत शिकवणी वर्ग बंद करा

शासकीय सेवेत असताना व्यवसाय : प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे साकडे
हिंगणघाट : शहरात शासकीय सेवेत असताना अवैध खासगी शिकवणी वर्ग घेतले जात आहे. अशा दुहेरी शिक्षकांचे अनधिकृत शिकवणी वर्ग त्वरित बंद करावे, अशी मागणी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनने संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरात शासकीय सेवेत असतानाही बेकायदेशीर शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांच्या अवैध शिकवणी वर्गाला कोणताही आळा घातला जात नाही. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अवैध शिकवणी वर्गावर कुठलेही निर्बंध घालण्यात आले नाही. प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करून हे अवैध शिकवणी वर्ग राजरोसपणे सुरू आहेत. शिक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्याकरिता अनेक युवक डीएड, बीएड करतात; पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही. यामुळे पर्यायी व्यवसाय म्हणून ते शिकवणी वर्ग घेतात. यातही शासकीय सेवेत असलेले शिक्षक अवैधरित्या शिकवणी वर्ग चालवित असल्याने त्यावरही परिणाम होतो. यामुळे या शिकवणी वर्गांवर त्वरित आळा घालावा, अशी मागणी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना नागपूर विभागीय अध्यक्ष सुनील पिंपळकर, जिल्हाध्यक्ष गणेश मुंगले, प्रभाकर मुंगले, पंकज भोंगाडे, प्रशांत भेदुरकर, अरुण घोटेकार, स्वप्नील बाराहाते, सुरेंद्र अनकर, सतीश कावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Close unauthorized tuition classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.