टॉवरवर चढून म्हणाले, विद्युत देयक माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:02+5:30
शहरातील गांधी चौकातील एसएसबी हॉस्पिटलच्या इतारतीवर असलेल्या टॉवरवर चढून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना काळातील चार महिन्यांचे विद्युत देयक माफ करण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी रेटण्यात आली.

टॉवरवर चढून म्हणाले, विद्युत देयक माफ करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विद्युत देयक जादा देण्यात आले. हे विद्युत देयक तातडीने माफ करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी सोमवारी युवा स्वाभिमानच्यावतीने टॉवरवर चढून विरुगिरी करण्यात आली. या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती.
शहरातील गांधी चौकातील एसएसबी हॉस्पिटलच्या इतारतीवर असलेल्या टॉवरवर चढून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना काळातील चार महिन्यांचे विद्युत देयक माफ करण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी रेटण्यात आली. आंदोलनाला एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी भेट दिली.
आंदोलनात दिलीप पोटफोडे, सिद्धांत कळंबे, अमरदीप लादे, वासुदेव सपकाळ, शंकर हत्तीमारे, राजू शिरगिरे, शेख सलमान, सुरेश वानखडे, बेबी बिहाडे, लक्ष्मी वादे, किरण सोलंकी, वनिता पवार, अतुल भुरे, सईदा शेख गफार, दुर्गा खंदारे, नीता भोयर, कोमल खंदारे, सलमा शहा, नीलिमा गोमासे, कमला काळबांडे, उज्ज्वला भाटिया, शीला परतेकी, कांता गुल्हाणे, शाहिस्ता पठाण, अशोक कोठेकर, शेख शब्बीर, मल्लासूर मेहरे, महिंद्रा मात्रे, सचिन दहाट, राहुल काळे आदी सहभागी झाले होते.