सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा
By Admin | Updated: March 12, 2017 00:36 IST2017-03-12T00:36:23+5:302017-03-12T00:36:23+5:30
सणांच्या दिवसांत जीवनोपयोगी वस्तूंचा ‘शॉर्टेज’ ही समस्या नेहमीचीच झाली आहे. हा प्रकार स्वस्त धान्य आणि सिलिंडरबाबतच नेहमी घडत आल्याने

सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा
सणाच्या दिवसांत कसरत : कामे सोडून रांगेत उभे राहण्याची वेळ
वर्धा : सणांच्या दिवसांत जीवनोपयोगी वस्तूंचा ‘शॉर्टेज’ ही समस्या नेहमीचीच झाली आहे. हा प्रकार स्वस्त धान्य आणि सिलिंडरबाबतच नेहमी घडत आल्याने नागरिकांतही रोष असतो. आताही दोनपैकी एका गॅस कंपनीच्या सिलिंडरचा शॉर्टेज निर्माण झाल्याने नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहे. सणांच्या दिवसांतही सिलिंडरसाठी कसरत करावी लागत असल्याचेच दिसून येत आहे.
जिल्ह्यात सध्या इण्डेन गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. बहुतांश वितरकांच्या कार्यालयात नागरिकांच्या रांगा पाहावयास मिळत आहे. मागणीनुसार सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने वितरकांच्या घरपोच सिलिंडर वितरण व्यवस्थेला चपराक बसली आहे. नागरिकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ते थेट वितरकांच्या कार्यालयातच सिलिंडर घेऊन पोहोचताना दिसून येत आहे. सध्या ‘स्टॉक’ नसल्याने काहींनी तर तत्सम फलकच लावल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील दोन गॅस वितरकांकडे ग्राहकांच्या रांगा दिसतात तर वर्धा शहरातील एका वितरकाकडे स्टॉकच नसल्याने तत्सम फलक लावल्याचे दिसून आले. नेमके सणांच्या दिवसांतच हे प्रकार घडत असल्याने रोष व्यक्त होत आहे. ही बाब जाणीवपूर्वक केली जात असल्याचेही नागरिक बोलून दाखवितात. एचपी गॅस सिलिंडरबाबत आसिफ जाहीद यांना विचारणा केली असता सिलिंडरचा मुबलक साठा असून सणांचे दिवस असल्याने रविवारीही सुरू ठेवणार आहे. कुठेही तुटवडा नाही, असे त्यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)