रेडझोनमधून येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:32+5:30
वर्धा जिल्ह्याच्या सर्व सिमेला लागून असलेल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिण्यापासून आपआपल्या जिल्ह्यात अडकलेले बँकेचे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणावरून वर्क फ्रॉमहोम करीत आहेत. तर तेथील स्थानिक शाखेत जावून वरिष्ठांच्या आदेशांनी अनेकांनी कामेही केली.

रेडझोनमधून येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा प्रशासनाने चांगले यश मिळविले आहे. यासाठी वेळीच अनेक उपाययोजना लागू केल्यामुळे हे शक्य होऊ शकले. मात्र २५ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे रेडझोनच्या जिल्ह्यातूनही बँक कर्मचारी आता वर्धा जिल्ह्यात बँकेत कामावर रूजू होऊ लागले आहे. त्यामुळे बँकेतील गर्दीत उभे राहणारे ग्राहक व त्यांचे सहकारी कर्मचारी धास्तावलेले आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या सर्व सिमेला लागून असलेल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिण्यापासून आपआपल्या जिल्ह्यात अडकलेले बँकेचे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणावरून वर्क फ्रॉमहोम करीत आहेत. तर तेथील स्थानिक शाखेत जावून वरिष्ठांच्या आदेशांनी अनेकांनी कामेही केली. वर्धा जिल्ह्यात अनेक बँकामध्ये यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी तेथे कन्टेनमेंट झोन तयार झाल्याने येवू शकले नव्हते. मात्र २५ मे रोजी निघालेल्या आदेशाच्या आधारे आता हे कर्मचारी आपल्या शाखांमध्ये रेडझोन जिल्ह्यातून दाखल होत आहे. त्यामुळे बँकेच्या या गर्दीत कोरोनाच्या सावटात काम करणे त्यांच्या सहकाऱ्यांनाही भितीदायक ठरत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्या वेळाही जिल्हा प्रशासनाने बदलविलेल्या असून आता सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत बँकेचे काम चालणार आहे. कर्मचारी स्वत: कोरोना बचावासाठी विविध साधणे वापरत आहे. मात्र येणारा प्रत्येक ग्राहक याची दक्षता घेईलच अशी स्थिती नाही. त्यामुळे बॅक कर्मचारी धास्तावले आहे.