शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

स्वच्छ शहराला पालिकेचा कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:25 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहर असा गाजावाजा करीत स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या पुलगाव पालिकेने शहरातील अंतर्गत स्वच्छतेला कोलदांडा दिल्याचेच दिसते.

ठळक मुद्देपुलगावातील प्रकार : साफ-सफाईसह विकास कामे ठप्पच, प्रशासन उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ शहर, सुंदर शहर असा गाजावाजा करीत स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या पुलगाव पालिकेने शहरातील अंतर्गत स्वच्छतेला कोलदांडा दिल्याचेच दिसते. शहरातील नाल्या तुंबल्या असून विकास कामेही ठप्पच आहे. पुलगाव नगर पालिका मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करीत असून पदाधिकारी अंतर्गत राजकारणात मशगुल असल्याचे दिसते. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे.भाजपाने जवळपास सर्वच नगर पालिका, नगर पंचायतींमध्ये एकहाती सत्ता मिळविली. केंद्र, राज्य तथा पालिकेमध्ये भाजपाची सत्ता असल्याने शहराचा चांगला विकास होईल, अशी पुलगावकरांची अपेक्षा होती; पण या अपेक्षेचा काही दिवसांतच भंग झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला अनेक ठिकाणी गाळाने व कचºयाने तुंबला आहे. सांडपाणी तुंबल्याने हरिरामनगर, शनि मंदिर परिसर, आठवडी बाजार, सुभाष नगर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मुख्य नाल्यामध्ये हरिरामनगर परिसरात बेशरम वाढली असून अनेक ठिकाणी नाला अरूंद झाला आहे. या नाल्यावर काहींनी अतिक्रमणही केले आहे. यामुळे सांडपाणी अडले असून नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. मुख्य मार्गावर या नाल्यावर असलेल्या पुलाजवळ सर्वत्र कचरा साचला आहे. यामुळे सांडपाणी वाहून जात नाही. याचा त्रास त्या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वास्तविक, या नाल्यावर एकाच ठिकाणी दोन पूल असल्याने त्याची वारंवार साफसफाई करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. वर्षभरातून एखाद वेळाच हा नाला साफ केला जातो. ही कामे करीत असतानाही कुचराई केली जाते.शहरातील अंतर्गत स्वच्छतेकडेही पुलगाव नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नगर पालिकेच्या इमारतीशेजारीच कचºयाचे ढिगारे दिसून येतात. या भागातून जाताना नाकाला रूमाल लावूनच जावे लागते. रेल्वे स्थानक चौक ते नाचणगाव मार्गावर अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे दिसून येतात. शिवाय रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेचा लघुशंकेसाठी वापर होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात अनेक हॉटेल, दुकाने असून त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आले; पण ते व्यवस्थित बुजविले नाहीत. परिणामी, शहरातील रस्त्यांची पूरती वाट लागली आहे.यासह अनेक समस्या शहरात सामान्य नागरिकांना दिसतात; पण विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या पुलगाव पालिका प्रशासनाला दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना, पुलगाव पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे या समस्यांकडे लक्षच नसून ते अंतर्गत राजकारणात व्यस्त असल्याचा आरोपही सामान्यांतून केला जात आहे.घंटागाड्यांवरील खर्च व्यर्थ, कचरा शेवटी उकिरड्यावरचपुलगाव नगर पालिकेकडे सहा घंटागाड्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकणे अपेक्षित होते; पण मागील सहा महिन्यांपासून त्या नागरिकांच्या दृष्टीस पडतच नाहीत. काही दिवसांपूर्वी याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर काही दिवस गाड्या वॉर्डात दिसून येत होत्या; पण पुन्हा त्या एकाच जागेवर दिसून येतात. एक सर्कस ग्राऊंडवर, दुसरी भलतीकडेच तर अन्य गाड्या दुरूस्तीसाठी नेल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रकारामुळे प्रत्येकच वॉर्डात कचºयाचे उकिरडे तयार झाल्याचे दृश्य आहे. नगराध्यक्ष तथा सत्ताधारी पक्षातील नगरसेवकही दुर्लक्ष करीत असल्याने शहराचा एकूण विकास खुंटला आहे. या सर्व प्रकारांकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तथा नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.चार महिन्यांत बैठकही नाहीनगर पालिका प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची नियमित बैठक घेणे बंधनकारक आहे; पण पुलगाव नगर पालिकेत मागील चार महिन्यांपासून सर्वसाधारण समितीची सभाही झाली नसल्याचे तथा दोन वर्षांत कुठलीही नवीन कामे काढली नसल्याची ओरड विरोधी पक्षातील नगर सेवकांतून करण्यात येत आहे.