स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: August 27, 2014 23:46 IST2014-08-27T23:46:08+5:302014-08-27T23:46:08+5:30
शहराचे सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था इत्यादी मूलभूत सुविधा शहरवासीयांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक नगर प्रशासनाची आहे. पण गर अनेक दिवसापासून शहरात

स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आरोग्य धोक्यात
पुलगाव : शहराचे सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था इत्यादी मूलभूत सुविधा शहरवासीयांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक नगर प्रशासनाची आहे. पण गर अनेक दिवसापासून शहरात स्वच्छतेच्या अभावी शहरातील मुख्य ठिकाणीही कचऱ्याचे ढिग साचले आहे. पावसामुळे दुर्गंधी वाढली आहे. साफसफाईअभावी शहरवासीयांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.
केरकचरा साठविण्यासाठी नगर परिषदेतर्फे लाखो रुपये खर्चून शहरात प्रत्येक वार्डात काही वर्षापूर्वी टिनाचे ढोले लावण्यात आले होते. परंतु त्यात साठविण्यात आलेला कचरा ढोल्यातच जाळल्या जात असल्यामुळे बहुतेक ढोले निकामी झाले व भंगारात निघाले. त्यानंरच प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी नगर परिषदेद्वारे लोखंडी कचराकुंड्या लावण्यात आल्या होत्या. याचेही काही महिन्यातच वारे न्यारे झाले.
नंतर १९ वार्डात घंटागाड्यांद्वारे शहरातील कचरा जमा करून गावाबाहेर नेण्यात येत होता. परंतु या घंटागाडी वाल्यावर घंटागाडीची निगा राखणे व स्वत:चा खर्च काढण्यासाठी प्रत्येक घरापोटी १० रुपये दिले जाणार होते. परंतु या घंटागाडीच्या खर्चास शासनाची मंजुरी नसल्यामुळे घंटा गाडी चालकाच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. अनेक घंटागाड्या नगर परिषद प्रांगणातच जमा करण्यात आल्या होता. मागील एक महिन्यापासून अनेक प्रभागात घंटा गाडी दिसेनाशी झाली आहे. सध्या कचरा उचलण्यासाठी नगर परिषद मध्ये पाच कायझन घंटागाड्याचे आगमन झाले. पण चालकाच्या प्रतीक्षेत त्या नगर परिषद प्रांगणात उभ्या आहेत. नगर प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे शहरातील अनेक भागातील नाल्या साफ करण्यात न आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. धर्मशाळा, पोस्ट आॅफिस, इंदिरा चौक, दीनदयाल उपाध्याय चौक याब महत्वाच्या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचे ढिग साचलेले असतात. नगर प्रशासनाने आरोग्यास धोकादायक असणाऱ्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)