मातीतील खेळाला संघटनेच्या वादाचा खोडा

By Admin | Updated: July 15, 2014 00:07 IST2014-07-15T00:07:42+5:302014-07-15T00:07:42+5:30

अस्सल मातीतील खेळ म्हणून ओळख असलेल्या कबड्डीने एकेकळी लोकप्रियतेचे सवौच्च शिखर गाठले होते. क्रिकेटची वाढती रसिकता या खेळाला मारक ठरली असली तरी संघटनेतील वाद खेळाच्या प्रसाराला

The clash of the game in the clutches of the organization | मातीतील खेळाला संघटनेच्या वादाचा खोडा

मातीतील खेळाला संघटनेच्या वादाचा खोडा

श्रेया केने - वर्धा
अस्सल मातीतील खेळ म्हणून ओळख असलेल्या कबड्डीने एकेकळी लोकप्रियतेचे सवौच्च शिखर गाठले होते. क्रिकेटची वाढती रसिकता या खेळाला मारक ठरली असली तरी संघटनेतील वाद खेळाच्या प्रसाराला आणि प्रचारातील मुख्य अडसर बनत आहे. जिल्हा आणि विदर्भ संघटनेतील वादामुळे खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. या वादामुळे संघटनेवर ‘स्टे’ येण्याची टांगती तलवार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कबड्डी या खेळाला गौरवशाली परंपरा आहे. जिल्ह्याने ही ७० आणि ८० च्या दशकात सुवर्णकाळ अनुभवला आहे. काशीनाथ रिठे यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. यात अन्य खेळाडूंनीही भर घातली. एकेकाळी जिल्ह्यात ८० हून अधिक क्लब होते. आता ही आकडेवारी ४० पर्यंत आली आहे. ग्रामीण भागात आजही कबड्डीचा असलेले वलय तसूभरही ओसरले नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तीन संघटना कार्यरत आहेत. विदर्भ संघटनेतील वाद २० वर्षांपासून प्रलंबित आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. यावर शासनाने आणि क्रीडा संचनालयाने मध्यस्थीची भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गौरवशाली परंपरा
-जिल्ह्याला या खेळात गौरवशाली परंपरा लाभली आहे. राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्याचा मानही मिळाला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद जिल्ह्याकडे होते. मात्र दिवसेंदिवस या खेळाकडील पे्रक्षक आणि खेळाडूंचा कल ओसरत आहे.
-जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेतही दबदबा निर्माण केला. या हिंगणघाट येथील दिवंगत कबड्डीपटू काशीनाथ रिठे यांचा काळ हा जिल्ह्यातील कबड्डीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना प्रेक्षकांनी ‘बंगालचा टायगर’ अशी उपाधी बहाल केली होती. याशिवाय रणजितसिंग ठाकूर, किशोर पोफळी, विजय रिठे, विनोद बिरे, भीमराव ढोक, मुरली फाले या खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक केला. महिलांत सीमा दुबे, योगिनी निमसडे सह गुणवंत खेळाडूंनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विद्यापीठ संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
-जिल्ह्यातील खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळविता आला नसला तरी या खेळाच्या प्रकाराकरिता सुभाष पिसे यांना राज्य शासनाने शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.

Web Title: The clash of the game in the clutches of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.