शेतीच्या वादावरून दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: January 3, 2015 23:07 IST2015-01-03T23:07:31+5:302015-01-03T23:07:31+5:30
शेतीच्या वादावरून नजीकच्या गिरोली व ममदापूर शिवारातील दोन वेगवेगळ्या घटनेत परस्पर विरोधी दोन्ही गटांनी ऐकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर

शेतीच्या वादावरून दोन गटात हाणामारी
देवळी : शेतीच्या वादावरून नजीकच्या गिरोली व ममदापूर शिवारातील दोन वेगवेगळ्या घटनेत परस्पर विरोधी दोन्ही गटांनी ऐकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालय उपचार करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
पोलीस सुत्रानुसार, गिरोली शिवारातील शेतीवरून निजेकर व हुडे कुटुंबीयांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. या वदातून त्यांच्यात अनेक वेळा वाद झाला. याच कारणावरून त्यांच्यात आज पुन्हा वाद उद्भवला. वादातून घटनेच्या हनुमान भगत, प्रभाकर हुडे, कान्हा हुडे व इतर तिघांनी मिळून मनोहर निजेकर तसेच त्यांची पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात त्याला जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची हवा दबते न दबते या घटनेचा वचपा काढण्याकरिता निजेकरच्या सहकाऱ्यांनी हुडे गटावर हल्ला केला.
हुडे गटातील सदस्य ममदापूरला परत जात असताना अतुल निजेकर, विठ्ठल पुजदेकर, मंगश निजेकर, दौतल निजेकर, शालू निजेकर आदींनी त्यांच्यावर कऱ्हाडीने प्रति हल्ला केला. यात प्रभाकर हुडे व त्यांच्या भावाला जबर मारहाण झाली. दोन्ही घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दोन्ही घटनेतील जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दवेळी पोलिसांनी पोलिसांनी दोन्ही गाटातील आरोपींवर भादंविच्या कलम १४३, ४७, ४८, ४९, ३२६, ४४७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)