शहर विकास आघाडीला सेनेचा जय महाराष्ट्र

By Admin | Updated: September 2, 2015 03:45 IST2015-09-02T03:45:41+5:302015-09-02T03:45:41+5:30

येथील नगराध्यक्षासह काँग्रेसचे पाच, भाजपा सहा व सेना एक अशी बारा नगरसेवकांची चार दिवसांपूर्वी शहर विकास आघाडी

City Development Alliance Sena's Jai Maharashtra | शहर विकास आघाडीला सेनेचा जय महाराष्ट्र

शहर विकास आघाडीला सेनेचा जय महाराष्ट्र

प्रभाकर शहाकार ल्ल पुलगाव
येथील नगराध्यक्षासह काँग्रेसचे पाच, भाजपा सहा व सेना एक अशी बारा नगरसेवकांची चार दिवसांपूर्वी शहर विकास आघाडी स्थापन झाली. यावर चर्चा सुरू असतानाच या आघाडीतील सेनेच्या नगरसेविका जयश्री बरडे यांनी आपला नवीन आघाडीशी संबंध नसल्याचे पत्रकातून जाहीर केले. यावर नगराध्यक्ष मनीष साहू यांनी आपण काँग्रेस मध्येच असून केवळ गटातून बाहेर पडल्याच्या खुलास्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
सन २०११ मध्ये पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १०, भाजपा पाच, सेना एक व अपक्ष तीन असे नगरसेवक निवडून आले होते. सत्ता थापण्यासाठी त्यावेळी भाराकाँ १०, सेना एक व अपक्ष तीन असा १४ सदस्यांचा गट तयार करून त्याची नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी झाली होती. काँग्रेसचे भगवानसिंग ठाकूर नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते तर या १४ नगरसेवकांच्या गटाच्या गटनेतेपदी काँग्रेसचे राजन चौधरी यांची वर्णी लागली. काँग्रेसच्या अर्चना राऊत व भाजपाचे संजय गाते यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली होती.
भगवानसिंग ठाकूर यांचा कार्यकाळ २२ जुलै १४ रोजी पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी बऱ्याच उलाढाली झाल्या. पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी पक्ष श्रेष्ठींनी वेळीच निर्णय घेऊन काँग्रेसचे मनीष साहू यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले.
तालुक्यातील देवळी नगरपरिषद काँग्रेसच्या हातून आधीच गेली. पुलगाव नगर परिषदेवर सत्ता राहावी, यासाठी पक्ष नेतृत्त्व सतत प्रयत्न करीत होते. पालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगर सेवकात असंतोष खदखदतच होता. अन्य नगर सेवक वर्ष लोटण्याची वाट पहात हाते. मागील दोन तीन महिन्यापासून नगराध्यक्ष मनिष साहू यांच्यावर अविश्वासाचे सावट पसरले होते. त्यातच काही भाजपाच्या संपर्कात होते. अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू असतानाच निवडून आलेले चार व सेनेचा एक असे पाच नगरसेवक काँग्रेस गटातून बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी केली व शहर विकास आघाडीची स्थापना केली. काँग्रेस व सहयोगी पक्षाच्या गटातून नगराध्यक्ष मनीष साहू, राजीव बतरा, स्मिता चव्हाण, सुनील ब्राह्मणकर व सेनेच्या जयश्री बरडे यांची नावे वगळण्यात यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
२८ आॅगस्ट रोजीच्या पत्राच्या दोन दिवसानंतरच सेनेच्या नगरसेविका बरडे यांनी आघाडीतून काढता पाय घेतल्याने ही आघाडी औटघटक्याची ठरल्याची चर्चा जोर धरू लागली. यामुळे राजकीय गटात खळबळ माजली असून शहर विकास आघाडीतील भाजपा व काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आघाडीबाबत शहरात संभ्रमाचे वातावरण
४शहर विकास आघाडीला जर सेना नगर सेविका जयश्री बरडे यांचा पाठिंबा नसेल तर काँग्रेस व सहयोगी पक्षाच्या गटाकडे काँग्रेसचे सहा, सेना एक व अपक्ष तीन असा १० नगरसेवकांचा गट राहण्याची शक्यता असल्यामुळे विद्यमान नगराध्यक्ष मनीष साहू यांचे नगराध्यक्ष अल्पमतात राहण्याची शक्यता आहे.

आम्ही काँग्रेस मध्येच, फक्त गटातून बाहेर
आम्ही काँग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडलो आहे. तयार करण्यात आलेली शहर विकास आघाडी कायम आहे. या आघाडीबाबत सेनेच्या नगरसेविकेचा जरा गैरसमज झाला होता. तो दूर करण्यात आला आहे. यामुळे त्या आघाडीत कायम आहेत.
-मनीष साहूू, नगराध्यक्ष, पुलगाव

Web Title: City Development Alliance Sena's Jai Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.