शहर स्वच्छता अभियान
By Admin | Updated: November 18, 2015 02:18 IST2015-11-18T02:18:06+5:302015-11-18T02:18:06+5:30
येथील विविध नऊ सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत शहर स्वच्छता अभियान राबविले. दिवाळीनंतर फटाक्यांमुळे निर्माण होणारा कचरा गोळा करण्यात आला.

शहर स्वच्छता अभियान
कचरा निर्मूलन : नऊ सामाजिक संघटनांचा सहभाग
हिंगणघाट : येथील विविध नऊ सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत शहर स्वच्छता अभियान राबविले. दिवाळीनंतर फटाक्यांमुळे निर्माण होणारा कचरा गोळा करण्यात आला. तसेच शहरातील विविध भागातील परिस्थितीची पाहणी करुन कचरा निर्मूलन अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
या अभियानाची सुरूवात नंदोरी चौक येथून करण्यात आली. यात ३ कि.मी लांबीचा रस्ता झाडण्यात आला. तसेच बसस्थानक, पोलीस स्टेशन परिसर आणि शहरातील प्रत्येक चौकाची यावेळी स्वच्छता करण्यात आली. गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. येथील प्रत्येक व्यावसायिकाला कचरा पेटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानात चिमुकल्यांपासुन ते वृध्दापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी अभिजीत डाखोरे, ज्ञानेश्वर चौधरी, आशिष भोयर, रमेश झाडे यांनी मार्गदर्शन केले. येथील विविध वॉर्डात हा उपक्रम प्रत्येक १५ दिवसांच्या कालावधीत राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
अभियानात पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर, प्रदीप गिरडे, कल्यानी लोणारकर, हेमंत हिवरकर, संजीवनी राऊत, गौरव जामुनकर तसेच लोकसाहित्य परिषदेचे अभिजीत डाखोरे, ज्ञानेश्वर चौधरी, मनोहर ढगे, गिरीधर काचोळे यासह अंनिसचे पंकज साखरकर, रोटरीचे अशोक चंदनखेडे, डॉ.राका, मियानी, ए.बी.व्ही.पी. चे अभय कोहपरे, गौरव तांबोळी, पक्षीमित्र प्रवीण कडू, निसर्ग वेध संस्थेचे अॅड. सागर हेमके, सत्यसाई सेवा मंडळाचे रमेश गुंडेवार, लक्ष्मण डहाके, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे वासुदेव वाटेकर, गुरूदेव सेवा मंडळाचे उत्तम पोहाणे, प्रा.श्रीकृष्ण बोढे, पदाधिकारी सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)