करवसुलीकरिता नगर परिषदेची धडक मोहीम
By Admin | Updated: February 20, 2016 03:01 IST2016-02-20T03:01:31+5:302016-02-20T03:01:31+5:30
थकीत करवसुलीकरिता वर्धा पालिकेच्यावतीने शहरात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

करवसुलीकरिता नगर परिषदेची धडक मोहीम
तीन दुकानांना ठोकले सील : तिघांची कापली नळजोडणी
वर्धा : थकीत करवसुलीकरिता वर्धा पालिकेच्यावतीने शहरात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत तीन दुकानांना कराच्या वसुलीकरिता सील लावण्यात आले. तसेच तीन मालमत्ताधारकांच्या नळाची कापणी करण्यात आली आहे.
ही धडक मोहीम पुढील काही दिवस राबविणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत वॉर्ड क्र. २३ मधील निर्मल बेकरी मार्गावरील थकित कर असणारे मालमत्ताधाकर राधाकिसन बालबक्ष जोशी यांचे दुकान, वॉर्ड क्रं. ८ आर्वी नाका चौकामधील मालमत्ताधारक सत्यजित पांडुरंग वाठमोडे याचे दुकान व वॉर्ड क्र १४ तिलक चौक मधील जयरामदास मुलचंद संगतानी यांच्या दुकानावर जप्तीची कार्यवाही करीत दुकानाला सिल लावण्यात आले.
कराचे देयक देत अनेकवेळा भेटी देवून सुद्धा कराचा भरणा न केल्यामुळे वॉर्ड क्रमांक १२ मधील मालमत्ताधारक गुलाब अमृत धोटे, वॉर्ड क्र. १३ मधील लक्ष्मीबाई जागोबा राऊत, वॉर्ड क्र. ३४ मधील कांताबाई भाऊराव लेंडे, वॉर्ड क्र. ३२ मधील वनवास मोटघरे यांच्याकडील नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढे सुद्धा जप्ती व धडक कर वसुली मोहीम निरंतर सुरू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सदर जप्ती व वसुलची कार्यवाही कर अधिकारी रवींद्र जगताप, सहा. कर निरीक्षक अशोक नंदरधने, करसंग्राहक ज्ञानेश्वर परटक्के, गजानन पेटकर, एजाज फारूकी, विजय किनगावकर, रमेश भुरे, प्रमोद देशमुख यांनी केलेली आहे.(प्रतिनिधी)