बारविरोधात नागरिक रस्त्यावर
By Admin | Updated: April 3, 2017 01:26 IST2017-04-03T01:26:48+5:302017-04-03T01:26:48+5:30
बाणेर रोडवरील डेरॉन हाईट्स इमारतीत सुरू असलेल्या पाच बारच्या विरोधात नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.

बारविरोधात नागरिक रस्त्यावर
पारा ४२.६ अंशावर : शहरातील रस्त्यांवर दुपारच्यावेळी शुकशुकाट
वर्धा : मार्चखेरीस पारा ४३ अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत आहे. याचा परिणाम जनजीवनावर होत असून दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली दिसते. कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक शक्यतो सकाळच्या वेळेत कामे आटोपण्याचा प्रयत्न करतात. प्रखर उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळेच दुपारच्या वेळेत शहराच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो.
बहुतांश नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर जाण्याचे टाळताना दिसतात. पारा चाळिसीपार गेल्यावरच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली होती. त्यातच कमाल आणि किमान तापमान वाढतच असल्याने उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहे. या उन्हात फिरताना अंगाची लाहीलाही होते. दुपारच्या वेळतील उन्हाच्या झळा प्रखर असतात.
या उन्हात फिरणे ही बाब आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाज किंवा अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. आजारी व्यक्ती व लहान मुलांनी यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे. याचाच परिणाम म्हणून शहरातील सर्व वर्दळीचे मार्ग दिवसाला जवळपास निर्मनुष्य झालेले दिसतात. (स्थानिक प्रतिनिधी)
एप्रिलचे तापमान यंदा मार्च महिन्यापासून जाणवायला लागले. दिवसभर वातावरण तापल्याने या उन्हाच्या झळा रात्री ८ वाजेपर्यंत जाणवतात. मात्र सूर्य मावळतीला लागल्यावर शहरातील सर्व प्रमुख वर्दळीचे रस्ते पुन्हा गर्दीने फुललेले दिसतात. मात्र दिवसाच्यावेळी अघोषित संचारबंदी असल्यकहे दिसते. यातच अघोषित भारनियमन केले जाते. प्रत्यक्षात भारनियमन नाही. त्याबाबतचे वेळापत्रक संअंधीत यंत्रणेने जाहीर केलेले नाही. तरीही दिवसातून दोन ते तीन वेळा काही वेळाकरिता वीजपुरवठा खंडित होतो. दुपारच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
आकोली - मार्च अखेरीस तापमानात अचानक वाढ झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण जीवनावर पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील रस्ते ओस पडले आहे. त्यामुळे शेतीची कामेही प्रभावित झाली आहे. शेतात काम करायला मजूर येत नाही. दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत असल्याने सायंकाळनंतर रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते.
सूर्य प्रखरतेने आग ओकत आहे. सकाळी १० वाजतानंतर उन्हाचा झळा अधिक जाणवतात. उन्हाच्या तीव्र झळामुळे ग्रामीण भाग होरपळला आहे. त्यात अघोषित भारनियमन केले जाते. त्यामुळे उकाड्यात अधिक भर पडत असल्याचे दिसते.
गावातील रस्त्यावर सध्या शांतता दिसत आहे. लोक शक्यतो १२ वाजेपर्यंत कामे उरकवून घेतात. वाढत्या उकाड्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहे. वखरणी, नांगरणी ही कामे खोळंबली आहे. शेतातील कचरा वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे.