शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 23:55 IST

एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्देअधिकारी करतात ग्रामस्थांना शिवीगाळ : सहायक अभियंत्याच्या खुर्चीवर ठेवले बेशरमचे झाड

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे. अनेकदा केळझरचे वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्याकडे दहेगाव वासियांनी तक्रारी केल्या. परंतु काहीच उपयोग झाला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या दहेगावच्या नागरिकांनी शनिवारी दुपारी केळझर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. कार्यालयात सहायक अभियंता जीवतोडे हजर नव्हते. बराच वेळ प्रतीक्षा केल्यावरही ते हजर न झाल्याने शेवटी वैतागून दहेगावच्या नागरिकांनी त्यांच्या खुर्चीवर बेशरमचे झाड ठेवून त्यांच्या सदोष कार्यप्रणालीचा निषेध केला.त्यानंतर काही वेळाने सहायक अभियंता जीवतोडे कार्यालयात आले असता संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी दोन महिन्यांपासून सुटीवर असलेल््या लाईनमन गाडेकर यांची बदली करण्यात यावी. तसेच गावातील शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यास लाईनमनशी संपर्क केल्यावर ते अश्लिल भाषेत शिवीगाळ करून नागरिकांना धमकावित असतात अशी तक्रार नागरिकांनी केली. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी चे संचालक संदीप वाणी गजानन चौधरी, किशोर गलांडे, योगेंश खाडे, प्रमोद कावळे, सतीश महाबुधे, सुनील पाटील, गजानन कोल्हे, सुनील रूईकर, अशोक गलांडे, निलेश मसराम, योगेश पाटील, विनोद ठाकरे, वैभव वाणी मारोतराव ठाकरे, विजय देवतळे, अनिल राणा, मोहन कावळे यांच्यासह मोठ्या संख्येने दहेगाव (गोसावी) येथील शेतकरी व गावकरी उपस्थित होते. दहेगाव गोसावी भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी विहीरी खोदण्यात आल्या आहेत. यातून शेतीला ओलीताची सोय केली जाते. महावितरण केंद्राकडून कमी दाबाचा वीज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे शेती सिंचन अडचणीत आले आहे. लाईनमन शेतकºयांना व्यवस्थित सेवा देत नसल्याने त्यांच्या प्रती रोष वाढला आहे.ग्राहकांना माराव्या लागतात सेलूला फेऱ्याकेळझर- येथील वीज भरणा केंद्रावर वीज देयक भरण्याकरिता जाणाºया ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागते. कारण वीज वितरण कंपनीचे दोषपूर्ण सॉफ्टवेअर याला कारणीभूत ठरले आहे. वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरण्याकरिता गेलेल्या वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या विद्युत देयकावरील भरावयाची मूळ रक्कम व देयक भरणा केंद्राच्या संगणकावर दर्शविण्यात येत असलेली रक्कम यात तफावत येत असल्याने सदर विद्युत देयक संगणक स्वीकारत नाही. त्यामुळे ग्राहकाना वीज देयक घेवून येथील सहायक अभियंता कार्यालयात यावे लागते. येथे त्यावर हस्तलिखीत दुरूस्ती करून सदर वीज देयक सेलू येथे भरण्यास पाठविल्या जाते. त्यामुळे ग्राहकांना अकारण वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. यात ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. तरी वीज वितरण कंपनीने हा घोळ दुरूस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.पोहणा- गेल्या पाच महिन्यांपासून रोहित्र बदलवूनही विद्युत पुरवठा सुरू न केल्यामुळे शेतकºयांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहे. वीज वितरण कंपनीच्या पोहणा कार्यालयांतर्गत हिवरा-बोपापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोटर पंपासाठी विद्युत पुरवठ्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आली. प्रयत्नाअंती दिवाकर नासरे यांच्या शेतात परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यासाठी रोहित्र बसवून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विद्युत खांब टाकून तारा सुद्धा ओढण्यात आल्या. वीजपुरवठा सुरू होणार व आपण ओलीत करू या उद्देशाने अनकांनी विद्युत पंप सुद्धा बसविले. केवळ विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी नसल्या कारणाने शेतकऱ्यांना ओलितापासून वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :electricityवीज