राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभवचा गौरव समितीद्वारे नागरी सत्कार

By Admin | Updated: February 3, 2016 02:22 IST2016-02-03T02:22:37+5:302016-02-03T02:22:37+5:30

गौरव समितीच्यावतीने स्थानिक गांधी चौकात शुक्रवारी सत्कार समारंभ घेण्यात आला.

Citizen felicitations by the President of the Pradhan Vaibhav Gaurav Samiti | राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभवचा गौरव समितीद्वारे नागरी सत्कार

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभवचा गौरव समितीद्वारे नागरी सत्कार

ग्रामस्थांचा उपक्रम : माता-पित्याचाही सत्कार
सिंदी (रेल्वे) : गौरव समितीच्यावतीने स्थानिक गांधी चौकात शुक्रवारी सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभव घंगारे याचा खासदार रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, प्रवीण हिवरे यांच्या शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन माता-पित्यासह गौरव करण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्टेट बँक, इलाहाबाद बँक तसेच समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेकडूनही वैभवचा गौरव करण्यात आला.
वैभवच्या कामगिरीने केवळ नगरीचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे नाव देशभर झळकले, अशा भावना खा. तडस, आ. कुणावार तिमांडे यांनी व्यक्त केल्या. शाळकरी मित्राला वाचविले याचा अभिमान आहे. भविष्यात सैन्यदलात भरती होऊन राष्ट्राची सेवा करण्याचे ध्येय नक्की केले, असे वैभव घंगारे याने सांगितले. तत्पूर्वी, शालेय बालकांनी उपस्थित नागरिकांचे, पथनाट्य, भारूड व मिमिक्री सादर करून मनोरंजन केले. कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, म्यू. नेहरू शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कामडी, आजी-माजी नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक आदी उपस्थित होते. शहर व परिसरातील स्त्री-पुरूष, विद्यार्थी आवर्जून हजर होते. प्रास्ताविक अमोल सोनटक्के यांनी केले. संचालन असलम पठाण यांनी केले तर आभार मुन्ना शुक्ला यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Citizen felicitations by the President of the Pradhan Vaibhav Gaurav Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.