न्यायालयाचे आदेश : पोलीस बंदोबस्तात चालला गजराजपुलगाव : गत काही दिवसांपासून सुरू असलेला सर्कस मैदानाचा सुरू असलेला वाद अखेर मिटला. न्यायालयाने या मैदानाचा ताबा पालिकेकडून काढून डॉ. जाकीर हुसेन उर्दू शाळेला दिला. यामुळे गुरुवारी सकाळी येथे असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबदस्तात काढून मैदान शाळेच्या स्वाधीन करण्यात आले. पालिकेच्या ताब्यात असलेले सदर मैदान गत काही वर्षांपर्वी डॉ. जाकीर हुसेन उर्दु हायस्कूल शिक्षण संस्थेस देण्यात आले होते. यामुळे नगर परिषद व शिक्षण संस्थेदरम्यान या जागेबाबत वाद सुरू होता. यावर तोडगा निघाला नसल्याने हा वाद न्यायालयात गेला. यात न्यायालयाने शाळेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे सदर मैदान उर्दू शिक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. या मैदानावर अनेक वर्षांपासून पानठेले, दुकाने व काही कच्ची घरे होती. या अतिक्रमणात एकूण १४ कच्च्या घरासह जवळपास ७० अतिक्रमण तोडली आहेत. अतिक्रमण काढतेवेळी उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार गायकवाड यांच्यासह शंभरावर कर्मचारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
सर्कस ग्राऊंड मोकळे
By admin | Updated: June 19, 2015 00:18 IST