शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंथन

By Admin | Updated: September 30, 2016 02:26 IST2016-09-30T02:26:54+5:302016-09-30T02:26:54+5:30

शिक्षकांच्या विविध समस्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्याशी महाराष्ट्र राज्य

Churning on teachers' pending questions | शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंथन

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंथन

नयना गुंडे यांच्याशी शिष्टमंडळाची तासभर चर्चा
वर्धा : शिक्षकांच्या विविध समस्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्याशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कक्षात सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी नयना गुंडे यांनी या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन त्यांना दिले. या चर्चेला महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, जिल्हा नेते वसंत बोडखे, विभाग प्रमुख अजय गावंडे, मंगेश कोल्हे, कृ ष्णा देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी चटोपाध्याय वेतन श्रेणीस पात्र प्रस्ताव निकाली काढणे, अप्रशिक्षीत नियुक्त ४३ शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी देणे, डीसीपीएस धारक शिक्षकांची कपात रक्कम जीपीएफ खाते जमा करावी या विषयावर विशेष चर्चा करण्यात आली. निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी, आयकर २४ क्यू अपडेट करणे, जीपीएफ कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढणे, आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम दरवर्षी शिक्षक दिनीच करावा या विषयांवर चर्चा झाली. जि.प. कर्मचारी, अधिकारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा या वर्षीही घेण्यात याव्या, वैद्यकीय प्रती पूर्तीची देयके त्वरित निकाली काढावे, शाळांचे वीज बिल जि.प. फंडातून भरण्यात यावे. आंतर जिल्हा बदलीने रूजू झालेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार एक ज्यादा वेतनवाढ मंजूर करण्यात यावी. यासह एकूण २२ प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
जि.प.पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीत शिक्षकांवर चुकीच्या पद्धतीने आघात करून कारवाई केली जात आहे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांना भयमुक्त व आनंदी राहून कार्य करू द्यावे. त्यातून चांगले शिक्षण होईल, असे मत पाटील यांनी मांडले. यावेळी अध्यक्ष सुनील कोल्हे, संघटक पंजाब गोंदाणे, सरचिटणीस गजानन पुरी, राज्य कार्य सदस्य दिनेश देशमुख, निलेश ढोकणे, माधव पाटील उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Churning on teachers' pending questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.