चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

By admin | Published: January 17, 2017 01:06 AM2017-01-17T01:06:38+5:302017-01-17T01:06:38+5:30

पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात.

Chimukala's Eye Viewed Roof | चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

Next

अतिक्रमणाचा मारा : बेघर, गरीबांना निवाऱ्यासाठीही मिळेना जागा
वर्धा : पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात. शहरभर हिंडून एखाद्या वस्तूची विक्री केल्यावरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. रस्त्याच्या कडेला हातगाड्या आणि अशा राहुट्यांचे वाढलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी होते. यात त्रेधातिरपीट उडते ती याच गोरगरीबांची.
गत कित्येक दशकांपासून हा प्रकार होत आहे. आजच्या अतिक्रमणा हटविण्याच्या माऱ्यातही दोन चिमुरड्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या डोईवर असलेले छप्पर हरविले. काही कळत नसले तरी त्या चिमुकल्यांचे निरागस डोळे व बालमन आपल्या आई-वडिलांच्या कृतीचा वेध घेत होते. काहीतरी गमावल्याचा भाव त्यांच्या डोळ्यात साचलेला पाहायला मिळाला. घर गेल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शहरांकडे बेरोजगारांचे लोंढे वाढत आहे. या शहरीकरणामुळे अतिक्रमणामध्ये वेगाने वाढ होत आहे. शहरांतील रस्ते अतिक्रमणामुळे निमूळते होत आहे तर खुली मैदाने, वस्त्यांमधील रिकाम्या जागांवर झोपड्या व अवैध दुकाने उभी राहत आहेत. या सर्व प्रकारांमुळे गजबज वाढत आहे. पैसा खर्च करून शहरात वास्तव्य करणाऱ्या शिक्षित, सुजाण नागरिकांना मात्र ही बाब रूजत नाही. व्यवसाय करीत असेल तर त्यांनी अधिकृत जागेची खरेदी करून तो करावा, अशी भूमिका घेतली जाते. यातूनच कधी नागरिकांच्या रेट्याने तर कधी प्रशासनाच्या पुढाकाराने शहरांतील अतिक्रमण हटविले जाते; पण यात कुठेही धनदांडग्यांचा बळी जात नसल्याचे वास्तव आहे.
गत दोन दिवसांपासून वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. यात अवैधरित्या भर रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने हटविली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगिचाजवळही शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात काही दुकाने, पानठेल्याचे पक्के अतिक्रमण तोडले. सोबतच त्याच रांगेत भिंतीलगत असलेली काही जुनाट साहित्यापासून बनलेल्या झोपड्याही धराशाई झाल्या. या झोपड्यांवर गजराज चालला नाही; पण कर्मचाऱ्यांच्या तंबीमुळे सदर नागरिकांनीच आपल्या झोपड्या एकेक बासा, टीन काढत गोळा केल्या. यात घरातील भांडे व अन्य साहित्य उघड्यावर आले होते. हे सर्व दृश्य दोन निरागस चिमुरडे पाहत होते. त्यांना काहीही कळत नसले तरी त्यांच्या डोळ्यादेखत ते बेघर होत होते. मन हेवालणारा हा प्रकार प्रत्येक अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये घडतो; पण या बेघरांच्या भावना जाणून घेण्यात कुणालाही रस नसतो. पण रात्रीचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच! यांचा विचार कुणी करावा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या नागरिकांप्रती कुणाचे काही कर्तव्य नाही काय, असा प्रश्नही आपसूकच उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Chimukala's Eye Viewed Roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.